Skip to content

Hittites बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 29 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. अशाप्रकारे मम्रेजवळील मकपेला येथे असलेले एफ्रोनाचे शेत आणि शेताच्या शेवटच्या टोकाला असलेली गुहा आणि त्याच्या चतुःसीमातील प्रत्येक झाड अब्राहामाने विकत घेण्याचा करार केला.

  2. हा करार शहराच्या वेशीसमोर सर्व हेथी लोकांच्या समक्ष झाला, ते सर्व अब्राहामाच्या कायमच्या मालकीचे झाले.

  3. त्यानंतर अब्राहामाने आपली पत्नी साराह हिला कनान देशात मम्रे (म्हणजे हेब्रोन) जवळ असलेल्या मकपेलाच्या शेतातील गुहेत पुरले.

  4. याप्रमाणे, हेथी लोकांनी स्मशानभूमी म्हणून शेत व त्यातील गुहा अब्राहामाच्या मालकीची झाल्याचा करार केला.

  5. यार्देनेच्या पश्चिमेकडील सर्व राजांनी—डोंगराळ प्रदेशाच्या राजांनी, पश्चिमी पर्वत पायथ्यावरील राजांनी आणि लबानोन पर्यंत असलेल्या भूमध्य समुद्रकिनार्‍यांवरील सर्व राजांनी (हिथी, अमोरी, कनानी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी राजांनी) या गोष्टींबद्दल ऐकले

  6. तेव्हा ते एकमताने यहोशुआ आणि इस्राएलविरुद्ध युद्ध करण्यास एकत्र आले.

  7. इस्राएली लोक कनानी, हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी, आणि यबूसींमध्ये राहू लागले.

  8. इस्राएली लोकांनी विवाहात त्यांच्या कन्या घेतल्या आणि आपल्या कन्या त्यांच्या पुत्रांना दिल्या आणि त्यांच्या दैवतांची उपासना करू लागले.

  9. इस्राएली लोकांनी याहवेहच्या दृष्टीने वाईट कृत्य केले; ते याहवेह त्यांच्या परमेश्वराला विसरले आणि बआल व अशेरा या दैवतांची उपासना करू लागले.

  10. अमोरी, हिथी, परिज्जी, हिव्वी व यबूसी यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते (हे लोक इस्राएली नव्हते).

  11. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांनाही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केले; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोक पूर्णपणे नष्ट करू शकले नव्हते, आजवर हे तसेच आहेत.

  12. हिथी, अमोरी, परिज्जी, हिव्वी आणि यबूसी (हे लोक इस्राएली नव्हते) यांच्यातील आणखी काही लोक बाकी राहिले होते.

  13. या लोकांचे वंशज जे देशात उरले होते त्यांचीही शलोमोनने सक्तीने गुलाम म्हणून भरती केली; हे ते लोक होते ज्यांना इस्राएली लोकांनी पूर्णपणे नष्ट केले नव्हते, आजवर हे तसेच आहे.