Skip to content

Father-in-Law बद्दल बायबलमधील वचने

14 वचने · 2 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. तेव्हा याकोब लाबानाला म्हणाला, “माझी पत्नी मला द्या. माझी मुदत संपली आहे, आता मला तिचा स्वीकार करता येईल.”

  2. तेव्हा लाबानाने वस्तीतील सर्व लोकांना बोलाविले आणि मेजवानी दिली.

  3. परंतु संध्याकाळी लाबानाने आपली कन्या लेआला याकोबाकडे पाठविले आणि याकोबाने तिच्याबरोबर रात्र घालविली.

  4. मी तुमच्याकडे वनपशूंनी फाडलेले प्राणी आणले नाहीत; मी स्वतः नुकसान सहन केले आणि दिवसा किंवा रात्री जे काही चोरीला गेले त्याबद्दल तुम्ही माझ्याकडून भरून घेतले.

  5. माझी परिस्थिती अशी होती: दिवसभर उन्हाचा आणि रात्री थंडीच्या कहराचा त्रास होत असे आणि झोप माझ्या डोळ्यावरून उडून जात असे.

  6. अशा स्थितीत मी वीस वर्षे काढली. चौदा वर्षे तुमच्या दोन मुली मिळविण्याकरिता आणि सहा वर्षे कळप मिळविण्याकरिता आणि तेवढ्या काळात तुम्ही दहा वेळेस माझ्या वेतनात फेरबदल केला.

  7. जर माझे पिता इसहाकाचे परमेश्वर, अब्राहामाचे परमेश्वर आणि इसहाकास ज्यांचे भय वाटते, ते माझ्यासह नसते, तर तुम्ही मला रिकामी हाताने पाठवून दिले असते. पण परमेश्वराने माझे परिश्रम व माझ्या हातांनी केलेले कष्ट पाहिले आणि म्हणूनच त्यांनी तुम्हाला काल रात्री दर्शन देऊन धमकाविले.”

  8. तिचा पती तिला परत आणावे म्हणून तिच्याकडे गेला. त्याच्याबरोबर त्याने एक सेवक आणि दोन गाढवे घेतली. तिने त्याला पित्याच्या घरी नेले आणि जेव्हा तिच्या पित्याने त्याला पाहिले, तेव्हा त्याने त्याचे आनंदाने स्वागत केले.

  9. त्याच्या सासर्‍याने म्हणजे स्त्रीच्या पित्याने त्याला थोडे दिवस राहण्याचा आग्रह केला; आणि म्हणून तो त्याच्यासोबत खातपीत आणि विश्राम करीत तिथे तीन दिवस राहिला.

  10. चौथ्या दिवशी ते पहाटेच उठले आणि त्या मनुष्याने निघण्याची तयारी केली, परंतु स्त्रीच्या पित्याने आपल्या जावयाला म्हटले, “काहीतरी खाऊन तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा; नंतर तुम्ही जाऊ शकता.”

  11. मग त्या दोघांनी एकत्र बसून खाणेपिणे केले. त्यानंतर स्त्रीचा पिता म्हणाला, “कृपया आजची रात्र थांबा आणि आनंद करा.”

  12. आणि जेव्हा तो पुरुष जाण्यास उठला तेव्हा त्याच्या सासर्‍याने त्याला आग्रह केला, म्हणून त्या रात्री तो तिथे राहिला.

  13. पाचव्या दिवसाच्या सकाळी, जेव्हा तो जाण्यास उठला, स्त्रीच्या पित्याने म्हटले, “तुम्ही स्वतःला ताजेतवाने करा. मग दुपारपर्यंत थांबा!” मग ते दोघे एकत्र जेवले.

  14. मग जेव्हा तो पुरुष, त्याची उपपत्नी आणि त्याचा सेवक जाण्यास उठले, तेव्हा त्याचा सासरा, त्या स्त्रीचा पिता म्हणाला, “पाहा, आता तर संध्याकाळ झालीच आहे. रात्र इथेच घालवा. दिवस संपत आला आहे. थांबा आणि आनंद करा. उद्या सकाळी लवकर उठा आणि आपल्या घरासाठी मार्गस्थ व्हा.”