Skip to content

Emulation बद्दल बायबलमधील वचने

13 वचने · 1 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. आता, बंधू भगिनींनो, मासेदोनियातील मंडळ्यांवर परमेश्वराने जी कृपा केली, ते तुम्हाला समजावे अशी माझी इच्छा आहे.

  2. अनेक भीषण परीक्षेमध्ये, त्यांचा ओसंडणारा आनंद आणि कमालीच्या दैनावस्थेत त्यांची उदारता प्रत्यक्षात आली.

  3. त्यांनी आपल्याला जे शक्य होते तेवढेच दिले असे नाही, तर आपल्या शक्तीपलीकडे दिले; आणि स्वतःहून दिले अशी मी साक्ष देतो.

  4. प्रभूच्या लोकांना साहाय्य करण्याच्या सेवेत त्यांना अनुमती दिली जावी आणि त्यांना सहभागी होता यावे म्हणून त्यांनी आम्हाला फार विनवणी केली.

  5. आमच्या अपेक्षेपेक्षा त्यांनी अधिक दिले, त्यांनी प्रथम स्वतः प्रभूला आणि परमेश्वराच्या इच्छेने आम्हालाही दिले.

  6. म्हणून आम्ही तीताला आग्रह केला की जशी प्रथम त्याने सुरुवात केली होती तर आताही कृपेच्या या कार्यातील वाटाही पूर्ण करण्यास तुम्हाला उत्तेजित करावे.

  7. तुम्ही प्रत्येक बाबतीत अग्रेसर आहात. तुमच्या विश्वासात, भाषणात, ज्ञानात, परिपूर्ण उत्साहात व आम्हाबद्दल प्रीतीत ज्याची प्रेरणा आम्ही तुम्हामध्ये निर्माण केली आहे—आता कृपेच्या देण्याविषयीही तुम्ही सुद्धा अग्रेसर असावे अशी माझी इच्छा आहे.

  8. याबाबतीत मी तुम्हाला आज्ञा करीत नाही; तर इतरांच्या उत्सुकतेशी तुमच्या प्रीतीच्या खरेपणाची परीक्षा करावयाची आहे.

  9. प्रभूंच्या लोकांना मदत करण्याच्या या सेवेबाबत मी तुम्हाला लिहावे याची गरज नाही.

  10. कारण अशी मदत करण्याविषयीची तुमची उत्सुकता मला चांगली माहीत आहे; आणि तुमची अखया येथून गेल्या वर्षापूर्वीच अशी देणगी पाठविण्याची तयारी होती, असे मी मासेदोनियांना मोठ्या अभिमानाने सांगितले आहे. खरे म्हणजे तुमचा हा उत्साह पाहूनच येथील अनेकांना मदत करावी अशी प्रेरणा झाली.

  11. या गोष्टीबाबतीत तुमच्याबद्दलचा माझा अभिमान व्यर्थ ठरू नये म्हणून मी या भावांना पाठवित आहे, यासाठी की मी तुम्हाला सांगितल्याप्रमाणे तुम्ही तयार असावे.

  12. मासेदोनियातील काही लोक माझ्याबरोबर आले आणि मी त्यांना सांगितल्याप्रमाणे तुमची काहीच तयारी नाही असे आढळले, तर आम्हास तुमच्याबद्दल जो भरवसा होता त्याबद्दल काही म्हणता येणार नाही व ते लाजिरवाणे ठरेल.

  13. म्हणून मला असे वाटले, हे आवश्यक आहे की, बंधूंना अशी विनंती करावी की त्यांनी प्रथम तुमची भेट घ्यावी आणि तुम्ही दिलेल्या आश्वासनानुसार उदारतेने देत असलेल्या देणगीची व्यवस्था पूर्ण करावी. तेव्हा ती एक मुक्तहस्ताने दिलेली भेट अशी असेल, असंतुष्टतेने देणार्‍यासारखी ती नसेल.