Skip to content

Commandments बद्दल बायबलमधील वचने

394 वचने · 3 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. कारण एखाद्या दुबळ्या विवेकबुद्धीच्या मनुष्याने तुमच्यासारख्या ज्ञानी व्यक्तीला मूर्तीच्या मंदिरामध्ये अन्न खातांना पाहिले तर ते मूर्तीला वाहिलेले खाण्याचे त्याला धैर्य प्राप्त होणार नाही का?

  2. म्हणून आपले अशक्त बंधू व भगिनी ज्यांच्यासाठी ख्रिस्त मरण पावले, अशांचा तुमच्या ज्ञानामुळे नाश होऊ नये.

  3. जेव्हा तुम्ही अशाप्रकारे त्यांच्याविरुद्ध पाप करता व त्यांच्या दुबळ्या विवेकबुद्धीला इजा पोहोचविल्याने तुम्ही ख्रिस्ताविरुद्ध पाप करता.

  4. यामुळे जे मी खातो त्यामुळे माझ्या बंधू व भगिनींना पापाचे कारण होत असेल, तर मी मांस कधीच खाणार नाही, म्हणजे मी त्यांच्या अधःपतनास कारणीभूत होणार नाही.

  5. त्यांच्यातील काही मूर्तिपूजक होते, तसे तुम्ही होऊ नका. असे लिहिले आहे: “लोकांनी बसून खाणेपिणे केले व उठून चैनबाजीची मजा घेऊ लागले.”

  6. त्याचप्रमाणे त्यांच्यातील काही लोकांनी लैंगिक अनीतीला वाव दिला, तसे आपण करू नये आणि एका दिवसात तेवीस हजार लोक मरण पावले.

  7. आपण ख्रिस्ताची परीक्षा पाहू नये, जशी त्यांच्यातील काहीजणांनी पाहिली आणि ते सर्पदंशाद्वारे मरण पावले.

  8. आणि कुरकुर करू नका, जशी त्यांच्यापैकी काहींनी केली आणि ते नाश करणार्‍या दूताच्या हातून मरण पावले.

  9. पण समजा, “हे यज्ञात वाहिलेले आहे” असे तुम्हाला कोणी सांगितले, तर ज्याने ही सूचना दिली त्याच्यासाठी व सदसद्विवेकबुद्धीसाठी तुम्ही ते खाऊ नये.

  10. अशा प्रसंगी तुम्ही त्या माणसाची सदसद्विवेकबुद्धीने लक्षात घ्यावी, तुमची नव्हे. माझ्या स्वातंत्र्याचा न्याय दुसर्‍यांच्या विवेकभावाला अनुसरून का व्हावा?

  11. किंवा जर मी त्या भोजनामध्ये परमेश्वराचे आभार मानून सहभागी झालो, तर ज्यासाठी मी धन्यवाद दिला त्याबद्दल मला दोष का देण्यात यावा?

  12. तुम्ही जे खाता किंवा पिता किंवा जे काही करता ते सर्व परमेश्वराच्या गौरवासाठीच करावे.

  13. यहूदी असोत की गैरयहूदी असोत किंवा परमेश्वराची मंडळी असो, कोणालाही तुमच्यामुळे अडखळण होऊ नये.

  14. जागृत राहा; विश्वासात स्थिर राहा; धैर्याने वागा व खंबीर असा.

  15. तुम्ही जे काही करता ते प्रीतीने करा.

  16. प्रिय बंधू व भगिनींनो, जर कोणी पापात सापडला, तर तुम्ही जे आत्मिक आहात त्या तुम्ही त्याला सौम्य रीतीने सुधारावे. तुम्ही स्वतःस सांभाळा, कदाचित तुम्हीही मोहात पडाल.

  17. एकमेकांची ओझी वाहा, आणि अशा रीतीने ख्रिस्ताचा नियम पूर्ण कराल.

  18. प्रभूसाठी बंदिवान म्हणून, मी तुम्हाला आग्रहाची विनंती करतो, की तुम्हाला झालेल्या पाचारणास शोभेल असे जीवन जगावे.

  19. पूर्ण नम्रतेने आणि सौम्यतेने; सहनशीलतेने, प्रीतीने एकमेकांचे सहन करा.

  20. शांतीच्या बंधनात व पवित्र आत्म्याद्वारे ऐक्य टिकविण्यास झटावे.

  21. “तुम्ही रागावले असला तरी पाप करू नका.” तुम्ही रागात असताना सूर्य मावळू देऊ नका.

  22. आणि सैतानाला पाय ठेवण्यास जागा देऊ नका.

  23. चोरी करणार्‍यांनी चोरी न करता आपल्या हातांनी चांगले व उपयोगी असे काम करावे, म्हणजे गरजवंत लोकांना देण्याकरिता त्यांच्याजवळ काहीतरी असेल.

  24. आपल्या मुखाद्वारे अपायकारक शब्द बाहेर पडू देऊ नका. परंतु प्रसंगाला अनुसरून ऐकणार्‍यांसाठी उपयुक्त व त्यांच्या वृद्धीसाठी कारणीभूत होईल असे बोला.

  25. परमेश्वराच्या पवित्र आत्म्याला दुःखी करू नका, कारण त्याच्याद्वारे तुम्ही खंडणीच्या दिवसासाठी शिक्का मारलेले आहात.