Skip to content

Candlestick बद्दल बायबलमधील वचने

17 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. “शुद्ध सोन्याचा एक दीपस्तंभ बनवा. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून कराव्या आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असावीत.

  2. दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाव्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला.

  3. एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.

  4. आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले त्याच्या कळ्या व फुले बनवावे.

  5. दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी असावी, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस, आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली असावी; सर्व मिळून सहा फांद्या असाव्या.

  6. या सर्व कळ्या व फांद्या शुद्ध सोन्याच्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून असाव्या.

  7. मग त्यांनी शुद्ध सोन्याचा दीपस्तंभ बनविला. त्याची बैठक, त्याचा दांडा घडून आणि त्याच्या फुलाच्या आकाराची फुलपात्रे, त्याच्यावरील कळ्या व फुले ही सर्व त्याबरोबर अखंड असा तयार केला.

  8. दीपस्तंभाच्या बाजूंनी सहा फांद्या निघाल्या होत्या; तीन एका बाजूला व तीन दुसर्‍या बाजूला.

  9. एका फांदीवर बदामाच्या फुलांप्रमाणे कळ्या आणि फुले असलेल्या तीन वाट्या, पुढच्या फांदीवर तीन वाट्या आणि दीपस्तंभापासून पसरलेल्या सर्व सहा फांद्यांसाठी समान असावे.

  10. आणि दीपस्तंभावर वाटीच्या आकाराची चार बदामाची फुले व त्याच्या कळ्या व फुले होती.

  11. दीपस्तंभाच्या बाजूने निघालेल्या पहिल्या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस एक कळी होती, दुसरी कळी दुसर्‍या दोन फांद्यांच्या खालच्या बाजूस आणि तिसरी कळी तिसर्‍या फांदीच्या जोडीखाली होती; सर्व मिळून सहा फांद्या होत्या.

  12. या सर्व कळ्या व फांद्या असून दीपस्तंभाला घडीव शुद्ध सोन्याच्या एकाच अखंड तुकड्यापासून घडविल्या होत्या.

  13. “तुम्ही जगाचा प्रकाश आहात. डोंगरावर वसलेले शहर लपू शकत नाही.

  14. त्याचप्रमाणे लोक दिवा लावून तो मापाखाली ठेवत नाही. त्याऐवजी, दिवठणीवर ठेवतात म्हणजे घरातील प्रत्येकाला प्रकाश मिळावा.

  15. याचप्रकारे लोकांनी तुमची चांगली कामे पाहून तुमच्या स्वर्गीय पित्याचे गौरव करावे म्हणून तुमचा प्रकाश उजळू द्या.

  16. माझ्याशी कोण बोलत आहे हे पाहण्यासाठी मी मागे वळलो, आणि जेव्हा मी मागे वळलो तेव्हा तिथे सोन्याच्या सात समया असल्याचे मला दिसले.

  17. त्या समयांच्या मध्यभागी मानवपुत्रासारखा दिसणारा कोणी एक उभा होता. त्यांनी पायघोळ वस्त्र घातले होते व छातीवर सोन्याचा पट्टा बांधला होता.