मुख्य मजकुरावर जा

Birds बद्दल बायबलमधील वचने: Habits of

11 वचने · 107 पैलू

Habits of बद्दल वचने

  1. “जरी करकोचाच्या पंखांशी आणि पिसार्‍याशी त्यांची तुलना करता येत नाही तरी शहामृगाचे पंख आनंदाने फडफडतात.

  2. ती धुळीत आपली अंडी देते आणि वाळूमध्ये ती उबविते,

  3. एखाद्याच्या पायाखाली ती चिरडली जातील, किंवा कोणी वन्यपशू त्याला तुडवतील हे ती लक्षात घेत नाही.

  4. ती आपल्या पिलांना कठोरतेने वागवते, जसे काय ते तिचे नाहीत; तिच्या प्रसूती वेदना व्यर्थ गेल्या याचे तिला काहीच वाटत नाही,

  5. कारण परमेश्वराने तिला ज्ञान बहाल केले नाही किंवा तिला समजूतदारपणाचा वाटा दिला नाही.

  6. परंतु जेव्हा ती धावण्यासाठी आपले पंख पसरते, तेव्हा ती घोडा व त्याच्या स्वाराकडे बघून हसते.

  7. “बहिरी ससाणा उंच उडतो, आणि आपले पंख दक्षिणेकडे पसरतो, ते तो तुझ्या ज्ञानाने करतो काय?

  8. तुझ्या आज्ञेनेच गरुड उंच भरार्‍या मारत आणि आपले घरटे उंचावर बांधतात काय?

  9. तो उंच कडांवर वसतो आणि रात्री तिथेच राहतो; खडकाळ सुळका त्याचा भक्कम किल्ला आहे.

  10. तिथूनच तो आपले भक्ष्य शोधतो; त्याच्या नेत्रास ते दुरूनच दिसते.

  11. तिची पिल्ले रक्त पिऊन मेजवानी करतात. आणि जिथे मेलेले असतात, तिथे ती असतात.”