Skip to content

Birds बद्दल बायबलमधील वचने: God provides for

12 वचने · 107 पैलू

God provides for बद्दल वचने

  1. हे माझ्या जिवा, याहवेहचे स्तवन कर. हे याहवेह, माझ्या परमेश्वरा, तुम्ही किती थोर आहात; तुम्ही राजवैभव आणि तेजाने विभूषित आहात.

  2. तुम्ही प्रकाशास वस्त्रासमान धारण केले आहे; अंतराळास एखाद्या तंबूप्रमाणे विस्तीर्ण केले आहे,

  3. आणि आपल्या मजल्यांना जलस्तंभावर बसविले आहे. मेघ त्यांचे रथ आहेत; ते वार्‍याच्या पंखावर आरूढ होऊन जातात.

  4. ते वायूला आपले दूत; व अग्निज्वालांना आपले सेवक करतात.

  5. तुम्ही पृथ्वीला तिच्या पायावर असे स्थापित केले आहे, जे कधीही ढळणार नाही.

  6. तुम्ही पृथ्वीला गहन जलाशयरूपी वस्त्राने आच्छादिले; जलस्तर पर्वतापेक्षा उंच केले.

  7. परंतु तुम्ही धमकाविताच जलसंचयाने पलायन केले, तुमच्या गर्जनेच्या आवाजाने ते भिऊन पळाले;

  8. ते पाणी पर्वतांवरून वाहिले, दर्‍याखोर्‍यातून गेले, आणि तुम्ही नेमलेल्या पातळ्यांवर ते स्थिर झाले.

  9. तुम्ही त्यांना मर्यादा ठरवून दिली; जेणेकरून त्यांनी पृथ्वी पुन्हा कधीही व्यापून टाकू नये.

  10. त्यांनी खोर्‍यांमधून पाण्याचे वाहते झरे केले; पर्वतामधून त्यांचे प्रवाह वाहत गेले.

  11. ते कुरणातील सर्व प्राण्यांना पाणी पुरवितात; त्या ठिकाणी रानगाढवेही आपली तहान भागवितात.

  12. आकाशातील पक्षी त्या प्रवाहाकाठी घरटी बांधून राहतात; व वृक्षांच्या फांद्यांवरून गाणी गातात.