Birds बद्दल बायबलमधील वचने: Man's dominion over
Man's dominion over बद्दल वचने
पृथ्वीवरील प्रत्येक प्राणी आणि आकाशातील प्रत्येक पक्षी, जमिनीवर सरपटणारे प्रत्येक प्राणी आणि समुद्रातील सर्व मासे यांना तुमचे भय व दहशत वाटेल, कारण मी त्यांना तुमच्या ताब्यात दिले आहे;
जे काही सजीव आहे आणि पृथ्वीवर वावरते ते तुमचे अन्न असेल. धान्य व वनस्पती याबरोबरच आता ते सर्व मी तुमच्या स्वाधीन करतो.
तुम्ही त्यांना देवदूतांपेक्षा किंचित कमी असे घडविले आहे. गौरव आणि सन्मान यांचा मुकुट तुम्ही त्यांच्या डोक्यावर ठेवला आहे.
तुमच्या प्रत्येक हस्तकृतीवर तुम्ही त्यांना सत्ता दिली आहे; सर्वगोष्टी त्यांच्या पायाखाली ठेवल्या.
सर्व कळप व गुरे, आणि वनपशू.
आकाशातील पक्षी, आणि समुद्रातील मासे, सागरात संचार करणारे सर्व प्राणी.