Birds बद्दल बायबलमधील वचने: (Snaring,) of designs of the wicked
(Snaring,) of designs of the wicked बद्दल वचने
माझ्या मुला, जर पापी माणसे तुला मोहात पाडतील, तर त्यांच्यामध्ये जाऊ नकोस.
जर ते म्हणतील, “आमच्याबरोबर ये; आपण निर्दोषांचा रक्तपात करण्यास टपून बसू, चला काही निरुपद्रवी आत्म्यावर हल्ला करू या;
चला कबरेसारखे आपण त्यांना जिवंत गिळंकृत करू, आणि ते पूर्णपणे आत जातील, असे खोल खड्ड्यात घालू;
आपल्याला सर्वप्रकारचा मौल्यवान खजिना मिळेल आणि लुटलेल्या वस्तूंनी आपण आपली घरे भरून टाकू;
आमच्याबरोबर चिठ्ठी टाक; लुटलेला माल आपण सर्व वाटून घेऊ”—
माझ्या मुला, तू त्यांच्याबरोबर जाऊ नकोस, तू तुझे पाऊल त्यांच्या मार्गात टाकू नकोस;
कारण दुष्कर्म करण्यासाठी त्यांचे पाय धावतात, ते रक्तपात करण्यासाठी चपळाई करतात.
जिथे पक्षी स्वतःच्या डोळ्यांनी पाहू शकेल असे जाळे पसरविणे किती व्यर्थ आहे!