मुख्य मजकुरावर जा

Barzillai बद्दल बायबलमधील वचने: 1. A friend of David

12 वचने · 3 पैलू

1. A friend of David बद्दल वचने

  1. दावीद जेव्हा महनाईम येथे पोहोचला, तेव्हा अम्मोन्यांच्या राब्बाह येथील नाहाशाचा पुत्र शोबाई आणि लो-देबार येथील अम्मीएलाचा पुत्र माखीर आणि रोगलीम येथील गिलआदी बारजिल्लई यांनी

  2. दावीद आणि त्याच्या लोकांसाठी बिछाने आणि पात्रे, मातीची भांडी आणली. त्यांना खाण्यासाठी गहू व जव, पीठ आणि भाजलेली धान्ये, शेंगा व डाळी,

  3. मध व दही, मेंढरे आणि गाईच्या दुधाचा खवा, हे सुद्धा आणले. कारण ते म्हणाले, “रानात दावीद आणि त्याचे लोक थकलेले, भुकेले व तहानलेले झाले असतील.”

  4. बारजिल्लई गिलआदी हा सुद्धा रोगलीम येथून दावीद राजाबरोबर यार्देन पार करून देण्यास आणि तिथून त्यांना त्यांच्या मार्गी लावण्यास आला होता.

  5. बारजिल्लई फार उतार वयाचा झाला होता, तो ऐंशी वर्षाचा होता. महनाईम येथे असताना त्याने राजाला सामुग्री पुरविली होती, कारण तो फार धनवान मनुष्य होता.

  6. राजाने बारजिल्लईस म्हटले, “माझ्याबरोबर पार चल आणि यरुशलेममध्ये माझ्याजवळ राहा आणि मी तुझे पालनपोषण करेन.”

  7. पण बारजिल्लईने राजाला उत्तर दिले, “मी अजून किती वर्षे जगणार, की मी राजाबरोबर यरुशलेमास जावे?

  8. मी ऐंशी वर्षाचा आहे. कोणत्या गोष्टी मला आनंद देतील आणि कोणत्या नाही यातील फरक मला सांगता येईल काय? आपला सेवक जे काही खातो किंवा पितो याची चव तरी त्याला कळते काय? गाणारे पुरुष किंवा स्त्रियांचा आवाज मला अजूनही ऐकायला येतो काय? माझ्या स्वामीला त्यांचा सेवक एक ओझे म्हणून का असावा?

  9. आपला सेवक काही अंतरापर्यंत आपणाबरोबर यार्देन नदी पार करेल, पण राजाने मला त्याचा मोबदला याप्रकारे का द्यावा?

  10. आपल्या सेवकाला परत जाऊ द्या, की मी माझ्या नगरात, माझ्या पित्याच्या व आईच्या कबरेजवळ पुरला जाईन. परंतु आपला सेवक किमहाम येथे आहे. त्याला माझ्या स्वामीबरोबर पार जाऊ द्यावे, व आपणास जे योग्य वाटेल ते आपण त्याचे करावे.”

  11. राजाने म्हटले, “किमहाम माझ्याबरोबर पार जाईल आणि तुझ्या इच्छेनुसार मी त्याचे करेन. आणि जे मी तुला करावे असे तुला वाटते ते मी तुझ्यासाठी करेन.”

  12. तेव्हा सर्व लोकांनी यार्देन पार केली आणि मग राजाने पार केली. राजाने बारजिल्लईचे चुंबन घेऊन त्याला आशीर्वाद दिला आणि बारजिल्लई आपल्या घरी परत गेला.