मुख्य मजकुरावर जा

Access to God बद्दल बायबलमधील वचने

52 वचने · 18 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. माझे ऐका आणि मजकडे या; लक्ष द्या, म्हणजे तुम्ही जिवंत राहाल. मी तुमच्याबरोबर सर्वकाळचा करार करेन, माझ्या विश्वासू प्रीतीचे वचन मी दावीदाला दिलेले आहे.

  2. याहवेहच्या प्राप्तीचा काळ आहे, तेव्हा पर्यंतच त्यांचा शोध घ्या. ते समीप आहेत, तेव्हा पर्यंतच त्यांचा धावा करा.

  3. ‘चला, उठा, आपण सीयोनकडे जाऊ, आपले परमेश्वर याहवेहकडे, जाऊ या.’ ” पहारेकरी एफ्राईमच्या टेकड्यांवरून अशी आरोळी मारण्याचा दिवस येत आहे,

  4. परमेश्वराच्या वचनांचे पालन कर आणि याहवेहकडे परत ये. त्यांना सांगा: “आमच्या सर्व पापांची क्षमा करा, आणि कृपापूर्वक आमचा स्वीकार करा, म्हणजे आम्ही आमच्या ओठांची फळे वासराच्या अर्पणाप्रमाणे अर्पण करू.

  5. तरी आताही याहवेह म्हणतात, तुम्ही आपल्या संपूर्ण अंतःकरणाने, उपास, आक्रंदन व शोक करीत मजकडे परत या.

  6. तुम्ही प्रार्थना करता, तेव्हा आपल्या खोलीत जा, दार बंद करा आणि मग तुमच्या अदृश्य पित्याची प्रार्थना करा. तुम्ही गुप्त प्रकारे केलेली प्रार्थना तुमचा पिता ऐकेल, तेव्हा ते तुम्हाला प्रतिफळ देतील.

  7. यास्तव येशू त्यांना पुन्हा म्हणाले, “मी तुम्हाला निश्चित सांगतो की, मी मेंढरांचे दार आहे.

  8. मीच दार आहे; जो कोणी माझ्याद्वारे प्रवेश करतो त्याचे तारण होईल. ते आत येतील व बाहेर जातील आणि त्यांना कुरणे आढळतील.

  9. येशूंनी उत्तर दिले, “मार्ग आणि सत्य आणि जीवन मीच आहे. माझ्याद्वारे आल्याशिवाय पित्याकडे कोणीही येऊ शकत नाही.

  10. तिथे पोहोचल्यावर त्यांनी मंडळीला एकत्र बोलाविले आणि परमेश्वराने जे सर्वकाही त्यांच्याद्वारे केले व गैरयहूदीयांसाठी देखील विश्वासाचे दार कसे उघडले, याचा अहवाल सादर केला.

  11. ख्रिस्ताद्वारे विश्वासामुळेच त्यांनी आपल्याला या कृपेत प्रवेश दिला आहे. येथे आपण स्थिर आहोत व आपण परमेश्वराच्या आशेच्या गौरवाची प्रौढी मिरवितो.

  12. जे तुम्ही एकेकाळी खूप दूर होता, त्या तुम्हाला आता ख्रिस्त येशूंमध्ये, त्यांच्या रक्ताद्वारे निकट आणले आहे.

  13. कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे.

  14. येशूंमध्ये आणि त्यांच्यावरील विश्वासाद्वारे आम्ही पूर्ण स्वातंत्र्याने आणि आत्मविश्वासाने परमेश्वराजवळ जाऊ शकतो.

  15. एकेकाळी तुम्ही परमेश्वराला परके होता आणि वाईट कृत्यामुळे मनाने त्यांचे शत्रू झाला होता.

  16. परंतु आता त्यांनी ख्रिस्ताच्या भौतिक शरीराच्या मरणाद्वारे, तुमचा त्यांच्याशी समेट केला आहे, यासाठी की तुम्हाला त्यांच्या दृष्टीने पवित्र आणि निष्कलंक दोषरहित सादर करावे;

  17. तेव्हा आपल्यावर दया व्हावी आणि गरजेच्यावेळी साहाय्य मिळण्यासाठी आपल्याला कृपा प्राप्त व्हावी, म्हणून आपण धैर्याने प्रत्यक्ष परमेश्वराच्या कृपेच्या सिंहासनाजवळ जाऊ या.

  18. दशांश गोळा करणार्‍या लेवीनेही अब्राहामाद्वारे दशांश दिला असेही एखाद्याला म्हणता येईल.

  19. यास्तव त्यांच्याद्वारे परमेश्वराकडे येणार्‍या सर्वांचे पूर्णपणे तारण करण्यास ते समर्थ आहेत, कारण त्यांच्यासाठी मध्यस्थी करण्यास ते सदासर्वदा जिवंत आहेत.

  20. म्हणून प्रिय बंधू आणि भगिनींनो, आता येशूंच्या रक्ताद्वारे आपल्याला परमपवित्रस्थानी आत्मविश्वासाने जाता येते.

  21. आपल्यासाठी हा नवा व जीवनदायी मार्ग पडद्याद्वारे म्हणजे त्यांच्या शरीराद्वारे उघडला आहे.

  22. आणि आपल्यासाठी परमेश्वराच्या घरावर एक महान याजक आहेत,

  23. म्हणून आपली हृदये शुद्ध करण्यासाठी शिंपडले, दोषी विवेकापासून मुक्त झालेले व शुद्ध पाण्याने शरीर धुतलेले असे आपण खर्‍या अंतःकरणाने व विश्वासाच्या पूर्ण खात्रीने परमेश्वराजवळ येऊ.

  24. विश्वासाशिवाय परमेश्वराला संतुष्ट करणे अशक्य आहे, ज्या कोणाला परमेश्वराकडे यावयाचे असेल, त्याने परमेश्वर आहे असा विश्वास धरला पाहिजे व त्यांचा मनापासून शोध घेणार्‍यांना ते प्रतिफळ देतात.

  25. तुम्ही परमेश्वराजवळ या म्हणजे ते तुम्हाजवळ येतील. अहो पाप्यांनो, आपले हात धुवा आणि दुहेरी मनाचे जे आहेत त्यांनी आपली अंतःकरणे शुद्ध करावीत.