मुख्य मजकुरावर जा

Shechem

40 verses · 2 known names

हे नावानेही ओळखले जाते: Sichem

32.2100, 35.2800 गूगल नकाशावर पाहा

Shechem चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर एबेदचा पुत्र गाल म्हणाला, “अबीमेलेख कोण आहे आणि आम्ही शेखेमी लोकांनी त्याची चाकरी का करावी? तो यरूब्बआलाचा पुत्र नाही का आणि त्याचा कारभारी जबुल नाही का? शेखेमचा पिता हमोरच्या कुटुंबाची तुम्ही सेवा करा! अबीमेलेखाच्या कुटुंबाची आम्ही सेवा का करावी?

  2. त्याने अबीमेलेखकडे दूत पाठवून त्याला कळविले, “एबेदचा पुत्र गाल व त्याचे भाऊबंद शेखेमात आले आहेत आणि आता ते या शहराला तुझ्याविरुद्ध चिथावीत आहेत.

  3. तेव्हा अबीमेलेख आणि त्याच्या सर्व सैन्याने रात्रीच कूच केले आणि शेखेमजवळ त्यांनी आपल्या चार टोळ्या केल्या व शहराच्या सभोवती ते दबा धरून बसले.

  4. तेव्हा गालने शेखेमाच्या नागरिकांना लढण्यासाठी नेले व अबीमेलेखाशी तो लढला.

  5. मग अबीमेलेख अरुमा येथे राहिला आणि जबुलाने गाल आणि त्याच्या भाऊबंदांना शेखेमातून घालवून दिले.

  6. शेखेमातील लोकांच्या सर्व दुष्टाईबद्दल परमेश्वराने त्यांना शिक्षा दिली. यरूब्बआलाचा पुत्र योथामचा शापही त्यांच्यावर आला.

  7. आणि मग ते म्हणाले, पाहा, शिलोह येथे याहवेहचा उत्सव दरवर्षी असतो, तो बेथेलाच्या उत्तरेस आहे, जो रस्ता बेथेलापासून वर शेखेमास जातो त्याच्या पूर्वेकडे आणि लबोनाहच्या दक्षिणेस आहे.”

  8. रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले.

  9. तेव्हा यरोबोअमने एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील शेखेम शहर बांधले व तिथे राहिला. तिथून पुढे त्याने पेनुएल बांधले.

  10. एफ्राईमच्या डोंगराळ प्रदेशातील नगर शेखेम (शरणपूर) व त्याचे शिवार, तसेच गेजेर व त्याचे शिवार,

  11. त्यांच्या वस्त्या व नगरे बेथेल व त्याच्या आसपासची गावे, पूर्वेस नारान, पश्चिमेस गेजेर व त्याची गावे, शेखेम व त्याची गावे, गाझा व त्याची गावे आणि अय्याहपर्यंत त्याची वतने होती.

  12. रेहोबोअम शेखेम येथे गेला, कारण इस्राएलचे सर्व लोक त्याला राजा करावे म्हणून तिथे गेले होते.

  13. परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.

  14. परमेश्वराने त्यांच्या पवित्रस्थानी घोषणा केली: “मी विजयाने शेखेमचे विभाजन करेन, आणि सुक्कोथाचे खोरे मोजून त्याचे इतरांना वाटप करेन.

  15. याहवेहच्या मंदिरामध्ये उपासना करण्यासाठी शेखेम, शिलोह व शोमरोनात येथून ऐंशी माणसे मिस्पाहच्या रोखाने आली. त्यांच्या दाढ्या काढल्या होत्या. त्यांनी आपले कपडे फाडले होते, तसेच त्यांनी स्वतःला जखमा करून घेतल्या होत्या; त्यांनी बरोबर अर्पणे व ऊद आणली होती.