मुख्य मजकुरावर जा

Samaria

113 verses

32.2800, 35.1900 गूगल नकाशावर पाहा

Samaria चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. काही काळानंतर अरामचा बेन-हदाद राजाने आपल्या सर्व सैन्याची जमवाजमव करून शोमरोनावर स्वारी केली आणि त्याला वेढा दिला.

  2. शोमरोन शहरात फार मोठा दुष्काळ पडला; वेढा इतका काळ राहिला की गाढवाचे मुंडके चांदीच्या ऐंशी शेकेलला आणि कबुतराची एक पावशेर विष्ठा पाच शेकेलला विकली गेली.

  3. अलीशाने उत्तर दिले, “याहवेहचे वचन ऐका. याहवेह असे म्हणतात: उद्या याच सुमारास शोमरोनच्या वेशीत तुम्हाला एका शेकेलला एक सिआ सपीठ आणि एका शेकेलला दोन सिआ सातू मिळेल.”

  4. परमेश्वराच्या मनुष्याने राजाला सांगितल्याप्रमाणे झाले: “शोमरोनच्या वेशीजवळ एका शेकेलास एक सिआ सपीठ आणि एका शेकेलास दोन सिआ सातू विकत मिळू लागेल.”

  5. शोमरोनात अहाबाचे सत्तर पुत्र होते. येहूने येज्रीलच्या अधिकाऱ्यांना, वडिलांना आणि अहाबाच्या पुत्रांच्या पालकांना: जे शोमरोनात होते त्यांना एक पत्र लिहिले, ज्यामध्ये असे लिहिलेले होते,

  6. यानंतर येहू निघून शोमरोनाला गेला. वाटेत मेंढपाळांच्या बेथ-एकेद नावाच्या स्थानात गेला,

  7. जेव्हा येहू शोमरोनात आला, त्याने अहाबाच्या घराण्यातील उर्वरित लोकांना ठार मारले; याहवेहने एलीयाहला सांगितलेल्या वचनाप्रमाणे येहूने त्यांचा सर्वनाश केला.

  8. येहू मरण पावल्यानंतर त्याला शोमरोन येथे मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र यहोआहाज राज्य करू लागला.

  9. येहूने इस्राएलाचा राजा म्हणून शोमरोनात अठ्ठावीस वर्षे राज्य केले.

  10. यहूदीयाचा राजा अहज्याहचा पुत्र योआशच्या कारकिर्दीच्या तेविसाव्या वर्षी येहूचा पुत्र यहोआहाज शोमरोनमध्ये इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सतरा वर्षे राज्य केले.

  11. परंतु ते यरोबोअमाच्या घराण्याने इस्राएली लोकांना जी पातके करण्यास लावली होती, त्या पातकांपासून मागे फिरले नाहीत. शोमरोनात अशेरा मूर्तीचे स्तंभ देखील उभे होते.

  12. यहोआहाज आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला शोमरोनात मूठमाती देण्यात आली. त्याच्यानंतर त्याचा पुत्र योआश त्याच्या जागी राज्य करू लागला.

  13. यहूदीयाचा राजा यहोआशच्या कारकिर्दीच्या सदतिसाव्या वर्षी यहोआहाजाचा पुत्र योआश शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने सोळा वर्षे राज्य केले.

  14. योआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि यरोबोअम त्याच्या राजासनावर बसला. योआशाला शोमरोनात इस्राएलांच्या राजांसोबत मूठमाती देण्यात आली.

  15. याहवेहच्या मंदिरातील आणि राजवाड्याच्या तिजोरीतून सर्व सोने, चांदी व सापडतील ती पात्रे त्याने घेतली, त्याने कैद्यांना सुद्धा घेतले आणि तो शोमरोनास परतला.

  16. यहोआश आपल्या पूर्वजांना जाऊन मिळाला आणि त्याला इस्राएली राजांसोबत शोमरोनात मूठमाती देण्यात आली. आणि त्याच्यानंतर त्याचा पुत्र यरोबोअम हा त्याच्या जागी राज्य करू लागला.

  17. यहूदीयाचा राजा योआशाचा पुत्र अमस्याहच्या कारकिर्दीच्या पंधराव्या वर्षी इस्राएलाचा राजा योआशचा पुत्र यरोबोअम शोमरोनात राज्य करू लागला आणि त्याने एकेचाळीस वर्षे राज्य केले.

  18. यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या अडतिसाव्या वर्षी यरोबोअमाचा पुत्र जखर्‍याह शोमरोनात इस्राएलावर राजा झाला आणि त्याने सहा महिने राज्य केले.

  19. यहूदीयाचा राजा उज्जीयाहच्या एकोणचाळिसाव्या वर्षी याबेशाचा पुत्र शल्लूम इस्राएलवर राज्य करू लागला आणि त्याने शोमरोनमध्ये एक महिना राज्य केले.

  20. नंतर गादीचा पुत्र मनाहेम हा तिरजाहवरून शोमरोनास गेला आणि त्याने याबेशाचा पुत्र शल्लूमास ठार मारले आणि तो त्याच्या ठिकाणी राज्य करू लागला.

  21. यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या कारकिर्दीच्या एकोणचाळिसाव्या वर्षी गादीचा पुत्र मनाहेम हा इस्राएलाचा राजा झाला, त्याने शोमरोनात दहा वर्षे राज्य केले.

  22. यहूदीयाचा राजा अजर्‍याहाच्या कारकिर्दीच्या पन्नासाव्या वर्षी मनाहेमचा पुत्र पेकाहियाह शोमरोनात इस्राएलवर राज्य करू लागला, त्याने दोन वर्षे राज्य केले.

  23. त्याचा एक मुख्य अधिकारी, रमाल्याहचा पुत्र पेकहने त्याच्याविरुद्ध कट रचला. गिलआदी लोकांपैकी पन्नास लोकांना बरोबर घेऊन त्याने पेकाहियाहला, अर्गोब आणि अरये यांच्यासह शोमरोन येथील राजवाड्याच्या वाड्यात मारले. पेकहने पेकाहियाहयाचा वध केला आणि त्याच्या जागी राजा झाला.

  24. यहूदीयाचा राजा अजर्‍याहच्या बावन्नाव्या वर्षी रमाल्याहचा पुत्र पेकह शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला आणि त्याने वीस वर्ष राज्य केले.

  25. यहूदीयाचा राजा आहाजच्या राजवटीच्या बाराव्या वर्षी एलाहचा पुत्र होशे शोमरोनात इस्राएलावर राज्य करू लागला, त्याने नऊ वर्षे राज्य केले.