मुख्य मजकुरावर जा

Nebuchadnezzar

88 वचने · 1 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Nebuchadrezzar

Nebuchadnezzar चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. “ ‘ “जर कोणतेही राष्ट्र किंवा राज्य बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची सेवा करणार नाही किंवा त्याचा जू आपल्या मानेवर ठेवणार नाही, मी त्या राष्ट्राला तलवार, दुष्काळ आणि मरीने शिक्षा करेन, जोपर्यंत मी त्याच्या हाताने त्यांचा नाश करत नाही, असे याहवेह घोषित करतात.

  2. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहूदीयाचा राजा, यहोयाकीमचा पुत्र यकोन्याह, याच्यासह यहूदीया व यरुशलेम येथील सर्व महत्त्वाच्या व्यक्तींना बाबिलोन येथे कैद करून नेले,

  3. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने लुटून नेलेली याहवेहच्या मंदिरातील सर्व पात्रे मी दोन वर्षात परत आणेन.

  4. आणि तिथे जमलेल्या समुदायाला उद्देशून हनन्याह म्हणाला, “याहवेह असे म्हणतात: याचप्रकारे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने सर्व राष्ट्रांच्या मानेवर ठेवलेले जोखड मी दोन वर्षात तोडून टाकेन.” हे ऐकताच यिर्मयाह संदेष्टा तिथून चालता झाला.

  5. सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: या सर्व राष्ट्रांच्या मानेवर मी लोखंडी जोखड ठेवले आहे, त्यांना मी बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरची गुलामगिरी करण्यास लावेन, व ते करतील. मी वनपशूही त्याच्या ताब्यात देईन.’ ”

  6. नबुखद्नेस्सरने यरुशलेमहून बाबेलला बंदिवासात नेलेल्या लोकांपैकी अवशेष वडीलजनांना, याजकांना, संदेष्ट्यांना व इतर सर्व लोकांना यिर्मयाहने लिहिलेल्या पत्राचा हा मजकूर आहे.

  7. यिर्मयाहने शाफानचा पुत्र एलासाह व हिल्कियाहचा पुत्र गमर्‍याह यांच्याकडे सुपूर्द ते केले, जे यहूदीयाचा राजा सिद्कीयाहने बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरकडे पाठविले. त्या पत्रातील मजकूर असा:

  8. सर्वसमर्थ याहवेह, इस्राएलचे परमेश्वर कोलायाहचा पुत्र अहाब व मासेयाहचा पुत्र सिद्कीयाह या तुमच्या खोट्या संदेष्ट्याविषयी असे म्हणतात: “त्यांचा तुमच्यासमोर जाहीरपणे वध व्हावा म्हणून मी त्यांना बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या हवाली करणार आहे.

  9. यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या राजवटीच्या दहाव्या वर्षी, म्हणजे बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरच्या कारकिर्दीच्या अठराव्या वर्षी, याहवेहकडून यिर्मयाहला पुढील वचन प्राप्त झाले:

  10. म्हणून याहवेह असे म्हणतात: मी हे नगर बाबिलोनचे लोक व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर यांच्या हाती देणार आहे, जो ते हस्तगत करेल.

  11. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, त्याची संपूर्ण सेना व त्याच्या अंकित असलेल्या सर्व राज्यांच्या व लोकांच्या सेना, यरुशलेम व सभोवतालची सर्व नगरे यांच्याबरोबर युद्ध करीत असताना, यिर्मयाहला याहवेहकडून हे वचन आले:

  12. परंतु जेव्हा बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरने या देशावर हल्ला केला, आम्ही म्हटले, ‘चला, बाबिलोनचे व अराम्यांपासून आपला बचाव करण्यासाठी आपण यरुशलेमला पलायन करू या.’ म्हणून आम्ही यरुशलेम येथेच राहत आलो आहोत.”

  13. बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने यहोयाकीमचा पुत्र कोन्याह याची यहूदीयाचा नवा राजा म्हणून नेमणूक केली नाही. त्याऐवजी त्याने योशीयाहचा पुत्र सिद्कीयाह याची निवड केली.

  14. यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याच्या कारकिर्दीच्या नवव्या वर्षी, दहाव्या महिन्याच्या दहाव्या दिवशी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर आपले सर्व सैन्य घेऊन यरुशलेमवर चालून आला व त्याभोवती वेढा घातला.

  15. परंतु बाबेलच्या सैन्याने त्यांचा पाठलाग केला व सिद्कीयाहला यरीहोच्या मैदानात पकडले व बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याकडे हमाथ राज्यातील रिब्लाह या शहरात आणण्यात आले. त्या ठिकाणी सिद्कीयाला शिक्षा सुनाविण्यात आली.

  16. आता बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने गारद्यांचा सरदार नबुजरदानला यिर्मयाहविषयी अशी आज्ञा दिली:

  17. आणि मग त्यांना सांग, ‘सर्वसमर्थ परमेश्वर याहवेह, इस्राएलचे परमेश्वर असे म्हणतात: मी माझा सेवक बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरला इजिप्तमध्ये पाठवेन. मी त्याचे सिंहासन याच लपविलेल्या धोंड्यावर स्थापन करेन; मग तो त्यावर आपला राजमंडप पसरेल.

  18. याहवेह असे म्हणतात: ‘जसे मी यहूदीयाचा राजा सिद्कीयाह याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍या बाबेलचा राजा, नबुखद्नेस्सरच्या हवाली केले होते, तसेच मी इजिप्तचा राजा, फारोह होफ्रा, याला त्याचा जीव घेऊ पाहणार्‍यांच्या हातात देईन.’ ”

  19. इजिप्तसंबंधी: योशीयाहचा पुत्र, यहूदीयाचा राजा यहोयाकीम, याच्या कारकिर्दीच्या चौथ्या वर्षी, बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर याने फरात नदीजवळ कर्कमीशच्या लढाईत इजिप्तचा राजा फारोह नखो व त्याचे सैन्य यांचा पराभव केला. त्या प्रसंगी इजिप्तच्या सेनेविरुद्ध हा संदेश देण्यात आला.

  20. यानंतर याहवेहने संदेष्टा यिर्मयाहला जो संदेश दिला तो इजिप्तवर हल्ला करावयास येणाऱ्या बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर, याच्याविषयी होता:

  21. त्यांना ठार मारावे अशी इच्छा धरणारे—बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर व त्याचे सैन्य यांच्या तावडीत मी त्यांना देईन. परंतु नंतर मात्र हा इजिप्त लढाईच्या उत्पातातून सावरेल आणि तिथे पूर्ववत वस्ती होईल, असे याहवेह जाहीर करतात.

  22. केदार व हासोरची राज्ये ज्यांच्यावर बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने हल्ला केला त्याविषयी: याहवेह असे म्हणतात: “सज्ज व्हा, व केदारवर हल्ला करा आणि पूर्वेच्या लोकांना नष्ट करा.

  23. “लवकर दूर पळा! हासोरवासीयांनो, खोल गुहेत दडून बसा,” कारण बाबेलचा राजा नबुखद्नेस्सरने तुमच्याविरुद्ध कट केला आहे; नबुखद्नेस्सर, त्याने तुमच्याविरुद्ध कारस्थान रचले आहे, याहवेह जाहीर करतात.

  24. “इस्राएली लोकांची मेंढराप्रमाणे पांगापांग झाली आहे, सिंहाने पाठलाग करून त्यांना पळविले आहे. प्रथम ज्याने त्यांना गिळंकृत केले तो अश्शूरचा राजा होता; नंतर त्यांच्या हाडांचा चुराडा केला तो बाबेलचा राजा नबुखद्नेस्सर होता.”

  25. “बाबेलच्या नबुखद्नेस्सर राजाने आम्हाला गिळंकृत केले आहे, त्याने आम्हाला निराशेत ढकलले आहे, त्याने आम्हाला रिक्त भांड्यासारखे केले आहे. सर्पासारखे त्याने आम्हाला गिळले आहे. आणि आमच्या मिष्टान्नाने स्वतःचे पोट भरले आहे, आणि मग आम्हाला बाहेर थुंकून दिले आहे.