मुख्य मजकुरावर जा

John

89 वचने · 2 कुटुंब सदस्य

John चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. योहानाचे शिष्य गेल्यानंतर, येशू जमावाशी योहानाविषयी बोलू लागले. ते म्हणाले, “तुम्ही ओसाड अरण्यात काय पाहण्यासाठी गेला? वार्‍याच्या झोताने हलणार्‍या लव्हाळ्याला काय?

  2. मी तुम्हाला सांगतो, स्त्रियांपासून जन्मलेल्या व्यक्तीमध्ये योहानापेक्षा कोणीही श्रेष्ठ नाही. तरीपण परमेश्वराच्या राज्यामध्ये जो कनिष्ठ आहे, तो त्याच्यापेक्षाही श्रेष्ठ आहे.”

  3. जकातदारांसह सर्व लोकांनी येशूंचे हे शब्द ऐकले. परमेश्वराचे मार्ग न्याय्य आहेत, हे त्यांनी योहानाकडून पूर्वीच बाप्तिस्मा घेऊन मान्य केले होते.

  4. कारण योहान भाकरी खात नसे किंवा द्राक्षारस पीत नसे आणि तुम्ही म्हणता, ‘त्याला दुरात्म्याने पछाडले आहे.’

  5. येशूंबद्दल शासक हेरोदाने सर्वकाही ऐकले. तेव्हा तो घोटाळ्यात पडला. कारण काही लोक म्हणत होते, “हा बाप्तिस्मा करणारा योहान पुन्हा जिवंत झाला आहे.”

  6. पण हेरोद म्हणाला, “मी तर योहानाचा शिरच्छेद केला होता, मग हा मनुष्य कोण ज्याच्याबद्दल मी ऐकत आहे?” आणि तो येशूंना भेटण्याचा प्रयत्न करू लागला.

  7. ते म्हणाले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; आणखी काहीजण म्हणतात, आपण मरणातून उठलेले प्राचीन काळातील संदेष्ट्यांपैकी एक आहात.”

  8. एके दिवशी येशू एका ठिकाणी प्रार्थना करीत होते. प्रार्थना संपल्यावर त्यांच्या शिष्यांपैकी एकाने त्यांना म्हटले, “प्रभूजी, योहानाने जशी त्याच्या शिष्यांना प्रार्थना करावयास शिकविले, त्याप्रमाणे तुम्हीही आम्हास शिकवा.”

  9. “योहान येईपर्यंत मोशेचे नियमशास्त्र आणि संदेष्टे होते त्या वेळेपासून परमेश्वराच्या राज्याची शुभवार्ता गाजविली जात आहे आणि प्रत्येकजण आत जाण्याचा नेटाने प्रयत्न करीत आहे.

  10. योहानाचा बाप्तिस्मा स्वर्गापासून किंवा मनुष्याकडून होता?”

  11. पण जर आपण म्हणालो ‘मनुष्यापासून होता,’ तर सर्व लोक आपल्याला दगडमार करतील. कारण योहान संदेष्टा होता, याबद्दल लोकांची पुरेपूर खात्री होती.”

  12. परमेश्वराने योहान नावाच्या मनुष्याला पाठविले.

  13. योहानाने त्यांच्याबद्दल साक्ष दिली. तो ओरडून म्हणाला, “ज्यांच्याविषयी मी म्हणालो होतो, ‘जो माझ्यानंतर येणार आहे तो माझ्यापेक्षा थोर आहे, कारण तो माझ्यापूर्वी होता.’ ”

  14. जेव्हा यहूदी पुढार्‍यांनी यरुशलेम येथून याजक आणि लेवी यांना योहानाकडे विचारपूस करावयास पाठविले की तो कोण आहे, त्यावेळी योहानाने दिलेली ही साक्ष होय.

  15. तेव्हा योहान उत्तरला, “मी पाण्याने बाप्तिस्मा करतो, परंतु तुम्हामध्ये एकजण असा आहे की, ज्याला तुम्ही ओळखत नाही.

  16. हे सर्व यार्देन नदीच्या पलीकडे बेथानी येथे घडले, जिथे योहान बाप्तिस्मा देत होता.

  17. दुसर्‍या दिवशी येशूंना आपणाकडे येत असताना योहानाने पाहिले आणि तो म्हणाला, “हा पाहा, जगाचे पाप वाहून नेणारा परमेश्वराचा कोकरा!

  18. मग योहानाने अशी साक्ष दिली: “स्वर्गातून पवित्र आत्मा कबुतरासारखा खाली आला व त्यांच्यावर स्थिरावला.

  19. दुसर्‍या दिवशी योहान आपल्या दोन शिष्यांसह उभा असताना,

  20. योहानाचे बोलणे ऐकून ज्यांनी येशूंना अनुसरले होते, त्या दोन शिष्यांमधील एक आंद्रिया, शिमोन पेत्राचा भाऊ होता.

  21. आता योहान शालिमाजवळ असलेले एनोन येथे बाप्तिस्मा करीत होता, कारण तिथे विपुल प्रमाणात पाणी असून, लोक बाप्तिस्मा घेण्यासाठी येत असत.

  22. त्या वेळेपर्यंत योहान तुरुंगात टाकला गेला नव्हता.

  23. कोणाएका यहूदी मनुष्याने योहानाच्या शिष्यांबरोबर शुद्धीकरणाच्या विधीबद्दल वादविवाद केला.

  24. तेव्हा शिष्य योहानाकडे आले आणि म्हणाले, “गुरुजी, यार्देन नदीच्या पलीकडे जो मनुष्य आपल्याबरोबर होता व ज्यांच्याबद्दल आपण साक्ष दिली, ते बाप्तिस्मा करीत आहेत आणि पाहा, प्रत्येकजण त्यांच्याकडे जात आहे.”

  25. त्यावर योहानाने उत्तर दिले, “मनुष्याला जे काही स्वर्गातून दिले जाईल तेच प्राप्त होईल.