Skip to content

Zacharias

9 वचने · 2 कुटुंब सदस्य

Zacharias चा उल्लेख असलेली वचने

  1. यहूदीयाचा राजा हेरोद याच्या काळात तिथे जखर्‍याह नावाचा एक याजक होता, तो अबीयाच्या याजकवर्गातील होता; त्याची पत्नी अलीशिबासुद्धा अहरोनाच्या वंशाची होती.

  2. त्याला पाहताच जखर्‍याह चकित आणि भयभीत झाला.

  3. पण देवदूत त्याला म्हणाला, “जखर्‍याह भिऊ नकोस, कारण परमेश्वराने तुझी प्रार्थना ऐकली आहे. तुझी पत्नी अलीशिबा तुझ्यासाठी एक पुत्र प्रसवेल आणि तू त्याचे नाव योहान असे ठेव.

  4. जखर्‍याह देवदूताला म्हणाला, “मी याबद्दल खात्री कशी बाळगावी? मी वयस्क मनुष्य आहे आणि माझ्या पत्नीचेही वय होऊन गेले आहे.”

  5. इकडे लोक जखर्‍याहची वाट पाहत होते. तो मंदिरात इतका वेळ का थांबला याचे त्यांना आश्चर्य वाटले.

  6. तिने जखर्‍याहच्या घरात प्रवेश करून अलीशिबेला अभिवादन केले.

  7. मग आठव्या दिवशी जे बाळाची सुंता करण्यासाठी आले, ते त्याच्या वडिलांचे जखर्‍याह हेच नाव त्याला देणार होते,

  8. नंतर बालकाचा पिता जखर्‍याह पवित्र आत्म्याने परिपूर्ण झाला आणि भविष्यवाणी करू लागला:

  9. हन्ना व कयफा हे महायाजक पदावर होते. यावेळी जखर्‍याहचा पुत्र योहानास अरण्यात परमेश्वराचे वचन प्राप्त झाले.