मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. जेव्हा तुम्ही सत्याचा संदेश ऐकला, आणि तारणाच्या शुभवार्तेवर विश्वास ठेवला, तेव्हा तुमचा ख्रिस्तामध्ये समावेश झाला व तुम्हावरही वचनदत्त पवित्र आत्म्याचा शिक्का मारला गेला,

  2. आणि हा आत्मा परमेश्वराच्या लोकांसाठी खंडणी व आपल्याला वतनाचा विसार म्हणून त्यांच्या गौरवाच्या स्तुतीसाठी दिला आहे.

  3. या कारणासाठी, प्रभू येशूंवरील तुमच्या विश्वासाबद्दल आणि परमेश्वराच्या सर्व लोकांवर असलेली तुमची प्रीती याबद्दल आम्ही ऐकले, तेव्हापासून

  4. माझे हे मागणे आहे, की तुम्ही त्यांना अधिक चांगल्या रीतीने ओळखावे म्हणून परमेश्वर, जे आपल्या प्रभू येशू ख्रिस्ताचे गौरवशाली पिता, यांनी तुम्हाला ज्ञान व प्रकटीकरणाचा आत्मा द्यावा.

  5. मी प्रार्थना करतो की तुमच्या अंतःकरणाचे डोळे प्रकाशित केले जावेत, आणि पवित्र जनांमध्ये असलेल्या गौरवशाली वतनाच्या संपत्तीच्या आशेसाठी तुम्हाला पाचारण करण्यात आले आहे, हे तुम्ही ओळखून घ्यावे.

  6. जे विश्वास ठेवतात, त्यांना अमर्याद सामर्थ्य आहे. हे तेच महापराक्रमी सामर्थ्य आहे

  7. ज्याच्यायोगे त्यांनी ख्रिस्ताला मरणातून उठविले आणि स्वर्गात परमेश्वराच्या उजवीकडे बसविले,

  8. आणि परमेश्वराने सर्वकाही त्यांच्या पायाखाली ठेवले आणि मंडळीसाठी प्रत्येक गोष्टींमध्ये मस्तक म्हणून नियुक्त केले.

  9. मंडळी जे त्यांचे शरीर, तिला त्यांच्या परिपूर्णतेने सर्वकाही सर्वप्रकारे पुरवितात.

  10. तुम्ही स्वतःच्या पातकांमध्ये व अपराधांमध्ये मृत झालेले होता.

  11. आपण आपल्या अपराधांमध्ये मृत झालो असताना त्यांनी ख्रिस्तामध्ये आपणास जिवंत केले व कृपेनेच तुमचे तारण झाले आहे.

  12. आणि परमेश्वराने आपल्याला ख्रिस्त येशूंमध्ये उठवून स्वर्गीय राज्यात त्यांच्याबरोबर बसविले आहे.

  13. यासाठी की ख्रिस्त येशूंमध्ये त्यांची आपल्यावरील दया व येणार्‍या युगांमध्ये त्यांची कृपा किती अतुलनीय आहे हे आपणास दाखवावे.

  14. कारण परमेश्वराने पूर्वीच आमच्यासाठी नेमून ठेवलेली चांगली कृत्ये करण्याकरिता आम्ही ख्रिस्त येशूंमध्ये घडविलेली परमेश्वराची हस्तकृती आहोत.

  15. लक्षात असू द्या, त्या दिवसांमध्ये तुम्ही ख्रिस्तापासून अलिप्त, इस्राएलाच्या नागरिकत्वापासून वेगळे केलेले, कराराच्या वचनाला परके, आणि जगात परमेश्वरावाचून व आशेवाचून जगत होता.

  16. जे तुम्ही एकेकाळी खूप दूर होता, त्या तुम्हाला आता ख्रिस्त येशूंमध्ये, त्यांच्या रक्ताद्वारे निकट आणले आहे.

  17. कारण ते स्वतःच आपली शांती आहेत, त्यांनी दोन गटास एक केले आणि त्यांना विभक्त करणारी शत्रुत्वाची भिंत पाडली. त्यांनी आपल्या देहाने नियमशास्त्राला त्यांच्या आज्ञापालन व विधीसहित दूर केले. यात त्यांचा उद्देश हा होता की या दोघांमधून स्वतःसाठी एक नवा मनुष्य उत्पन्न करून शांती प्रस्थापित करावी.

  18. Having abolished in his flesh the enmity, even the law of commandments contained in ordinances; for to make in himself of twain one new man, so making peace;

  19. कारण त्यांनी क्रूसाद्वारे वैरभाव नाहीसा करून व दोघांना एक शरीर करून परमेश्वराशी समेट घडवून आणला.

  20. कारण त्यांच्याद्वारे आम्हा दोघांनाही एकाच आत्म्याद्वारे पित्याजवळ येण्याचे स्वातंत्र्य आहे.

  21. तुम्ही प्रेषित आणि संदेष्टे यांच्या भक्कम पायावर बांधलेले आहात, ज्याची मुख्य कोनशिला ख्रिस्त येशू आहेत.

  22. त्यांच्यामध्ये पूर्ण इमारत एकत्र जोडली जात असताना वाढत जाऊन प्रभूचे पवित्र मंदिर होत आहे.

  23. याकारणास्तव, मी पौल, तुम्हा गैरयहूदीयांसाठी ख्रिस्त येशूंचा बंदिवान आहे.

  24. अर्थात् हे रहस्य मला प्रकटीकरणाद्वारे समजले, याबद्दल मी यापूर्वी थोडक्यात लिहिले आहे.

  25. ते वाचल्यानंतर, ख्रिस्ताचे जे रहस्य आहे, त्याबद्दल मला झालेले ज्ञान तुम्हाला समजेल.