मुख्य मजकुरावर जा

Jesus

3,872 वचने · 6 कुटुंब सदस्य

हे नावानेही ओळखले जाते: Jesus Christ, Immanuel, Emmanuel, Christ

Jesus चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. पेत्राने त्यांना आपल्या हाताने खुणावून शांत केले आणि प्रभूने त्याला तुरुंगातून कसे बाहेर काढले, हे त्यांना सविस्तर सांगितले. मग तो त्यांना म्हणाला, “याकोब आणि बंधू भगिनींना याबद्दल सांगा,” मग तो दुसर्‍या स्थळी निघून गेला.

  2. हेरोदाने परमेश्वराला गौरव दिले नाही, म्हणून प्रभूच्या दूताने हेरोदावर तत्काळ प्रहार करून त्याला खाली पाडले आणि त्याला किड्यांनी खाऊन टाकले व तो मरण पावला.

  3. हे सर्वजण प्रभूची आराधना आणि उपास करीत असताना, पवित्र आत्मा त्यांना म्हणाला, “बर्णबा व शौल यांना ज्या कामासाठी मी पाचारण केले आहे त्यासाठी त्यांना वेगळे करा.”

  4. “तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय?

  5. तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला.

  6. राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला.

  7. रानात अंदाजे चाळीस वर्षे त्यांनी त्यांचे गैरवर्तन सहन केले;

  8. त्यांनी कनानातील सात राष्ट्रांना उलथवून टाकले व त्यांची भूमी वतन म्हणून त्यांच्या लोकांना दिली.

  9. हे सर्व घडून येण्यास सुमारे चारशे पन्नास वर्षे लागली. “त्यानंतर, परमेश्वराने त्यांना शमुवेल संदेष्टा येईपर्यंत न्यायाधीश नेमून दिले.

  10. शौलाला दूर केल्यानंतर, दावीदाला त्यांचा राजा म्हणून नेमले. या दावीदाबद्दल परमेश्वराने साक्ष दिली: ‘माझ्या मनासारखा मनुष्य इशायाचा पुत्र दावीद मला मिळाला आहे; माझ्या इच्छेप्रमाणे असणार्‍या प्रत्येक गोष्टी तो करेल.’

  11. “परमेश्वराने वचन दिल्याप्रमाणे, याच मनुष्याच्या वंशामधून येशूंना इस्राएली लोकांसाठी त्यांचा तारणारा म्हणून आणले आहे.

  12. येशू येण्यापूर्वी, योहानाने सर्व इस्राएली लोकांना पश्चात्तापाच्या बाप्तिस्म्याचा उपदेश केला.

  13. योहानाचे कार्य संपत आलेले असताना, योहानाने विचारले: ‘मी कोण आहे असे तुम्हाला वाटते? तुम्ही ज्याची वाट पाहता तो मी नाही. परंतु जो माझ्यामागून येत आहे, त्याच्या पादत्राणाचे बंद सोडण्याइतकी सुद्धा माझी योग्यता नाही.’

  14. यरुशलेममधील लोकांनी व त्यांच्या शासकांनी येशूंना ओळखले नाही, त्यांना दोषी ठरवून संदेष्ट्यांच्या त्या शब्दांची पूर्तता केली, ज्या शब्दांचे वाचन प्रत्येक शब्बाथ दिवशी त्यांच्यामध्ये केले जात होते.

  15. त्यांना जिवे मारण्यासाठी एकही योग्य पुरावा त्यांना सापडला नाही, तरी त्यांना मृत्युदंडाची शिक्षा द्यावी अशी मागणी त्यांनी पिलाताकडे केली.

  16. त्यांच्याबद्दलची सर्व भविष्ये पूर्ण झाल्यानंतर त्यांनी त्यांना क्रूसावरून खाली उतरविले व कबरेत ठेवले.

  17. परंतु परमेश्वराने त्यांना मृतांतून उठविले,

  18. जे गालीलाहून प्रवास करीत यरुशलेमला त्यांच्याबरोबर आले होते, त्यांना पुष्कळ दिवस ते प्रकट झाले. तेच आता आपल्या लोकांस त्यांचे साक्षीदार आहेत.

  19. परमेश्वराने ते वचन त्यांनी येशूंना मरणातून उठवून आमच्यासाठी म्हणजे त्यांच्या संतानासाठी पूर्ण केले आहे. त्याप्रमाणे दुसर्‍या स्तोत्रसंहितेमध्ये असे लिहिले आहे: “ ‘तू माझा पुत्र आहे आज मी तुझा पिता झालो आहे.’

  20. त्यांना कुजण्याचा अनुभव कधीही येऊ नये म्हणून परमेश्वराने त्यांना मरणातून जिवंत केले. परमेश्वर असे म्हणाले, “ ‘दावीद राजाला पवित्र व निश्चित आशीर्वाद देण्याचे वचन मी दिले होते.’

  21. म्हणून दुसर्‍या एका ठिकाणीही असे लिहिले आहे, “ ‘तू तुझ्या पवित्रजनाला कुजणे पाहू देणार नाहीस.’

  22. परंतु ज्याला परमेश्वराने मृतातून उठविले आणि त्याचे शरीर कुजले नाही.

  23. “यासाठी माझ्या मित्रांनो, माझी अशी इच्छा आहे की तुम्ही हे समजून घ्यावे की, येशूंच्याद्वारे पापक्षमेची घोषणा ही तुमच्यासाठी केली आहे.

  24. जो प्रत्येकजण विश्वास ठेवतो, तो त्यांच्याद्वारे सर्व पापांपासून मुक्त होतो, मोशेच्या नियमशास्त्राच्या आधारे ही गोष्ट पटवून देणे तुम्हाला शक्य झाले नव्हते.

  25. यासाठी प्रभूने आम्हाला ही आज्ञा दिली आहे: “ ‘पृथ्वीच्या दिगंतापर्यंत तुमच्याद्वारे मिळणारे तारण लाभावे, म्हणून मी तुला गैरयहूदीयांसाठी त्यांचा प्रकाश केले आहे.’ ”