मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याहवेहनी मोशेला सांगितले:

  2. इस्राएली लोकांना सांग: ‘जो कोणी आपल्या परमेश्वराला शिव्याशाप देईल त्याने आपल्या पापाची शिक्षा भोगावी;

  3. याहवेहच्या नावाची जो कोणी निंदा करेल त्याला निश्चित जिवे मारावे. संपूर्ण मंडळीने त्याच्यावर दगडमार करावा. परदेशीय असो किंवा देशात जन्मलेला, जेव्हा ते परमेश्वराच्या नावाची निंदा करतात त्यांना निश्चित जिवे मारावे.

  4. परदेशीय किंवा देशात जन्मलेल्यासाठी सारखाच नियम असावा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

  5. मग मोशे इस्राएली लोकांसोबत बोलला आणि त्यांनी त्या निंदा करणार्‍याला छावणीबाहेर नेले आणि त्याच्यावर दगडमार केला. याहवेहने मोशेला आज्ञापिल्यानुसार इस्राएली लोकांनी केले.

  6. सीनाय पर्वतावर याहवेहनी मोशेला सांगितले,

  7. “इस्राएली लोकांशी बोल आणि त्यांना सांग: ‘मी तुम्हाला देत असलेल्या देशात तुम्ही पोहोचाल, तेव्हा त्या भूमीने याहवेहसाठी शब्बाथ पाळावा.

  8. पण सातव्या वर्षी जमिनीला शब्बाथ विश्रांती राहील; जो याहवेहसाठी शब्बाथ आहे. तुम्ही तुमच्या शेतात बी पेरू नका आणि तुमच्या द्राक्षमळ्यांची छाटणी करू नका.

  9. एकमेकांचा गैरफायदा घेऊ नका, तर तुमच्या परमेश्वराचे भय बाळगा. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  10. “ ‘माझ्या आज्ञांचे पालन करा आणि माझे विधीचे पालन करण्याची काळजी घ्या, म्हणजे तुम्ही देशात सुरक्षितपणे राहाल.

  11. मी तुम्हाला असे आशीर्वादित करेन की जमीन सहाव्या वर्षी तीन वर्षापर्यंत पर्याप्‍त असे पीक देईल.

  12. “ ‘तुम्ही जमीन कायमचीच विकू नये. कारण जमीन माझी आहे आणि तुम्ही माझ्या भूमीवर परदेशी आणि परके म्हणून राहत आहात.

  13. परमेश्वराची भीती बाळगावी आणि तुमच्या बंधूला तुमच्या घरात राहू द्यावे. त्याला उसने म्हणून दिलेल्या पैशावर तुम्ही व्याज घेऊ नये.

  14. ज्याने तुम्हाला कनान देश देण्यासाठी आणि तुमचा परमेश्वर होण्यासाठी इजिप्त देशातून बाहेर आणले, तो मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  15. कारण इस्राएली तर माझे सेवक आहेत, मी त्याला इजिप्त देशातून बाहेर आणले आहे. म्हणून त्याची सर्वसाधारण गुलामाप्रमाणे विक्री केली जाऊ नये.

  16. त्यांना जुलमाने वागविले जाऊ नये, परंतु तुमच्या परमेश्वराचे भय बाळगावे.

  17. कारण इस्राएली लोक माझेच सेवक आहेत; मीच त्यांना इजिप्त देशातून बाहेर आणले; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  18. “ ‘तुम्ही आपणासाठी घडीव मूर्ती किंवा कोरीव मूर्ती किंवा मूर्तिस्तंभ यांची स्थापना करू नये, अथवा आपल्या देशात नतमस्तक होण्यासाठी कोरीव दगड ठेवू नये. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  19. “ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा, मी याहवेह आहे.

  20. “ ‘माझ्या विधीनुसार तुम्ही चालाल आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञा पाळाल,

  21. तर मी हंगामात तुमच्यासाठी पाऊस पाठवेन आणि जमीन पीक देईल आणि झाडे फळ देतील.

  22. “ ‘मी तुम्हाला शांती देईन म्हणजे तुम्ही निर्धास्तपणे झोप घ्याल. उपद्रव देणारे पशू मी हाकलून देईन आणि तुमच्या देशावर तलवार चालणार नाही.

  23. “ ‘मी तुमच्यावर कृपादृष्टी करेन, तुम्हाला बहुगुणित करेन व तुमच्याशी केलेला माझा करार दृढ करेन.

  24. मी तुमच्यामध्ये वस्ती करेन व मला तुमचा तिटकारा वाटणार नाही.

  25. मी तुमच्यामध्ये चालेन; मी तुमचा परमेश्वर होईन व तुम्ही माझे लोक व्हाल.