मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह मोशेला म्हणाले,

  2. या दिवशी कोणतीही कष्टाची कामे करू नये, परंतु याहवेहला अन्नार्पण म्हणून हवन करावे.’ ”

  3. नंतर याहवेह मोशेला म्हणाले,

  4. “सातव्या महिन्याचा दहावा दिवस प्रायश्चिताचा दिवस आहे. एक पवित्र मेळावा भरवावा आणि स्वतःचा नकार करावा आणि याहवेहला अन्नार्पण करावे.

  5. या दिवशी तुम्ही कोणतेही कामकाज करू नये, कारण हा दिवस याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे तुम्हाप्रीत्यर्थ प्रायश्चित्त करण्यात येईल.

  6. जो कोणी त्या दिवशी कोणतेही काम करेल त्याचा मी त्यांच्या लोकांमधून नाश करेन.

  7. याहवेह मोशेला म्हणाले,

  8. “इस्राएली लोकांना सांग: ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवसापासून याहवेहकरिता मंडपाचा सण सात दिवस पाळावा.

  9. सात दिवस याहवेहला अन्नार्पण करा आणि आठव्या दिवशी पवित्र मेळावा भरवून याहवेहला अन्नार्पण करा. हा मेळाव्याचा समारोप आहे; कोणतेही नियमित काम करू नका.

  10. (“ ‘हे याहवेहने स्थापित केलेले सण आहेत, जे तुम्ही याहवेहला अन्नार्पण करण्यासाठी पवित्र मेळावे घोषित करावे; होमार्पण, धान्यार्पण, शांत्यर्पण व पेयार्पण आवश्यक त्या दिवशी अर्पणे करावी.

  11. ही अर्पणे याहवेहच्या शब्बाथांच्या व्यतिरिक्त आहेत आणि हे यज्ञ तुम्ही परमेश्वराला अर्पण करता त्या तुमच्या देणग्या आणि नवस फेडावयाची अर्पणे आणि स्वैच्छिक अर्पणे त्या व्यतिरिक्त आहेत.)

  12. “ ‘सातव्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी, जेव्हा तुम्ही जमिनीचे पीक गोळा कराल, तेव्हा सात दिवस याहवेहपुढे सण पाळावा. पहिला दिवस हा शब्बाथ, विश्रामदिन आणि आठवा दिवसही शब्बाथाचा विश्रामदिन असेल.

  13. पहिल्या दिवशी तुम्ही दाट पाने असलेल्या झाडांच्या फांद्या—खजुरीच्या झावळ्या, वाळुंजे, आणि भरपूर पाने असलेली इतर झाडांच्या फांद्या—घेऊन याहवेह तुमच्या परमेश्वरापुढे सात दिवस आनंदोत्सव करावा.

  14. हा सात दिवसांचा वार्षिक सण तुम्ही याहवेहसाठी प्रत्येक वर्षी पाळावा. हा सर्वकाळचा नियम येणार्‍या पिढ्यांसाठी आहे; सातव्या महिन्यात हा सण साजरा करावा.

  15. यासाठी की, तुमच्या भावी पिढीला हे कळावे की, जेव्हा मी इस्राएलच्या घराण्याला इजिप्तमधून बाहेर काढले तेव्हा मी त्यांना मंडपात राहायला लावले. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

  16. अशाप्रकारे याहवेहनी नेमून दिलेले हे वार्षिक सण मोशेने इस्राएली लोकांना जाहीर केले.

  17. याहवेह मोशेला म्हणाले,

  18. सभामंडपातील जे पडदे कराराच्या कोशाला झाकतात, त्याच्याबाहेर अहरोनाने संध्याकाळपासून सकाळपर्यंत याहवेहसमोर दिवे सतत पेटत ठेवावेत, हा नियम पिढ्यान् पिढ्या असावा.

  19. याहवेहसमोर असलेल्या शुद्ध सोन्याच्या दीपस्तंभावरील दिव्यांची नियमितपणे व्यवस्था करावी.

  20. त्यांच्या दोन रांगा आणि प्रत्येक रांगेत सहा भाकरी शुद्ध सोन्याच्या मेजावर मांडून याहवेहसमोर ठेवाव्यात.

  21. प्रत्येक रांगेभोवती स्मरणभाग म्हणून शुद्ध धूप टाकावा, याचे प्रतीक म्हणून भाकर आणि अन्नार्पण हे याहवेहसाठी अर्पण करावी.

  22. ही भाकर याहवेहसमोर नियमितपणे मांडून ठेवावी, शब्बाथानंतर शब्बाथ, इस्राएली लोकांसाठी हा शाश्वत करार आहे.

  23. या भाकरी अहरोन व त्याच्या पुत्रांचा वाटा होय, ज्या त्यांनी पवित्रस्थानात बसून खाव्यात; कारण याहवेहला अर्पण केल्या जाणार्‍या यज्ञातील हा परमपवित्र भाग आहे. त्याचा त्यावर कायमचा अधिकार आहे.”

  24. इस्राएली स्त्रीच्या मुलाने परमेश्वराच्या नावाची निंदा केली आणि तो शिव्याशाप देऊ लागला; तेव्हा त्याला मोशेकडे आणले. (त्याच्या आईचे नाव शेलोमीथ होते, ती दान वंशातील दिब्रीची कन्या होती.)

  25. तेव्हा याहवेहची इच्छा त्यांना स्पष्ट समजून येईपर्यंत त्यांनी त्याला अटकेत ठेवले.