मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेह मोशेला म्हणाले,

  2. “वासरू, कोकरू वा करडू जन्मले असताना ते सात दिवस त्याच्या आईजवळ राहू द्यावे; आठव्या दिवसापासून याहवेहला अन्नार्पण करण्यास योग्य ठरेल.

  3. “ज्यावेळी तुम्ही याहवेहला उपकारस्तुतीच्या बलीचा यज्ञ करता तेव्हा अशा प्रकारे करावा की तो तुमच्यावतीने मान्य व्हावा.

  4. त्याच दिवशी ते खाऊन टाकावे; त्यातील काहीही सकाळपर्यंत ठेवू नये. मी याहवेह आहे.

  5. “तुम्ही माझ्या सर्व आज्ञा पाळाव्यात; मी याहवेह आहे.

  6. माझ्या पवित्र नावाला अपवित्र करू नका, कारण मला इस्राएली लोकांनी पवित्र म्हणून ओळखावे. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला पवित्र केले

  7. आणि ज्याने तुमचा परमेश्वर होण्यासाठी तुम्हाला इजिप्तमधून बाहेर आणले. मी याहवेह आहे.”

  8. याहवेह मोशेला म्हणाले,

  9. “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘हे मी नेमून दिलेले सण आहेत, याहवेहचे नेमून दिलेले सण, जे तुम्ही पवित्र मेळावे असे जाहीर करावे.

  10. “ ‘आठवड्यातील सहा दिवस त्यांनी कामकाज करावे, परंतु सातवा दिवस हा शब्बाथ, विश्रांतीचा दिवस आहे. पवित्र मेळाव्याचा दिवस. तुम्ही कोणतेही काम करू नये; तुम्ही कुठेही राहत असाल तरी याहवेहसाठी हा शब्बाथ आहे.

  11. “ ‘याहवेहने नेमून दिलेले हे पवित्र सण आहेत, पवित्र मेळाव्यांची घोषणा तुम्ही त्यांच्या ठरवून दिलेल्या वेळांमध्ये करावी:

  12. याहवेहच्या वल्हांडण सणाची सुरुवात पहिल्या महिन्याच्या चौदाव्या दिवसाच्या संध्याकाळपासून होते.

  13. त्या महिन्याच्या पंधराव्या दिवशी याहवेहचा बेखमीर भाकरीचा सण सुरू होतो; सात दिवस खमीर नसलेली भाकर खावी.

  14. सात दिवस याहवेहसाठी अन्नार्पण द्यावे. सातव्या दिवशी पवित्र सभा भरवावी आणि नियमित कामे करू नये.’ ”

  15. याहवेह मोशेला म्हणाले,

  16. “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी जो देश तुम्हाला देणार आहे, जेव्हा तुम्ही तिथे प्रवेश कराल आणि पिकांची कापणी कराल, तेव्हा तुम्ही कापणी केलेल्या पहिल्या धान्याची एक पेंढी याजकाकडे आणावी.

  17. त्याने याहवेहसमोर पेंढी ओवाळावी, जेणेकरून ते तुमच्यावतीने मान्य केले जाईल; शब्बाथाच्या दुसर्‍या दिवशी याजकाने ते ओवाळावे.

  18. आता ज्या दिवशी तुम्ही पेंढी ओवाळाल, त्याच दिवशी तुम्ही याहवेहला एक वर्षाच्या निर्दोष कोकर्‍याचे होमार्पण करावे.

  19. त्याच्या धान्यासोबत, जैतुनाच्या तेलात मळलेल्या सपिठाच्या एक एफाचा दहावा भाग जैतुनाच्या तेलात मळून अर्पावा; हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध आहे. त्यासोबत पावशेर हीन द्राक्षारसही याहवेहला अर्पण करावा.

  20. तुम्ही आपल्या परमेश्वराला हे सर्व अर्पण आणल्याशिवाय पिकातील कोणताही भाग म्हणजे कोवळी कणसे, त्या धान्याच्या भाकरी किंवा भाजलेले दाणे यापैकी काहीही खाऊ नये. तुम्ही कुठेही राहिले तरी येणार्‍या पिढ्यांसाठी हा कायमचा नियम आहे.

  21. पन्नासाव्या दिवशी म्हणजे सात शब्बाथ संपल्यानंतर दुसर्‍या दिवशी याहवेहला पुन्हा एकदा नवे अन्नार्पण करावे.

  22. तुम्ही कुठेही राहत असाल तरी अर्पण म्हणून दोन भाकरी आणाव्यात. एका एफाच्या दहा भागातील दोन भाग सपिठाच्या खमीर घालून भाजलेल्या असाव्यात, पहिल्या उत्पन्नातून ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी असे अर्पण आणावे.

  23. या भाकरीबरोबर तुम्ही एक वर्षाची सात निर्दोष नरकोकरे, एक गोर्‍हा व दोन मेंढे अर्पावे, ते पेयार्पण व अन्नार्पणासह याहवेहला एक होमार्पण असतील, याहवेहला प्रसन्न करणारा एक सुगंध होमार्पण.

  24. याजक ती प्रथम उपजाची भाकर घेऊन तिला ओवाळणी देईल व दोन मेंढ्यांबरोबर ती याहवेहला अर्पण करेल. हे सर्व याहवेहसाठी पवित्र ठरेल व ते याजकासाठी भाग म्हणून असेल.

  25. “ ‘तुम्ही आपल्या जमिनीतील पिकांची कापणी कराल, तेव्हा शेताच्या कानाकोपर्‍यातील पिकांची कापणी करू नये किंवा खाली पडलेले धान्य गोळा करू नये. हे गरिबांसाठी व तुम्हामध्ये राहणार्‍या परदेशीयांसाठी ते तसेच राहू द्यावे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”