God
God चा उल्लेख असलेली वचने
“ ‘तुम्ही बहिर्यांना शाप देऊ नये किंवा आंधळ्याच्या समोर अडखळण ठेवू नये, परंतु तुमच्या परमेश्वराची भीती बाळगावी. मी याहवेह आहे.
“ ‘तुमच्या लोकांमध्ये निंदा करीत फिरू नये. “ ‘तुमच्या शेजार्याचा जीव धोक्यात येईल असे काहीही करू नका. मी याहवेह आहे.
“ ‘सूड उगवू नका किंवा तुमच्या लोकांमध्ये कोणाचाही द्वेष करू नका, तर जशी तुम्ही स्वतःवर तशी तुमच्या शेजार्यावर प्रीती करावी. मी याहवेह आहे.
“ ‘माझ्या आज्ञा पाळा. “ ‘तुम्ही आपल्या पशूंना भिन्न जातीच्या जनावरांशी संग करू देऊ नये. “ ‘तुमच्या शेतात दोन प्रकारच्या बियांची पेरणी करू नका. “ ‘दोन प्रकारच्या कापडांपासून विणलेली वस्त्रे वापरू नयेत.
त्या मनुष्याने याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी आपले दोषार्पण म्हणून एक मेंढा आणलाच पाहिजे.
त्या मनुष्याने केलेल्या पापाबद्दल याजकाने त्या मेंढ्याद्वारे याहवेहसमोर प्रायश्चित्त करावे, म्हणजे त्याने केलेल्या पापाची त्याला क्षमा होईल.
चौथ्या वर्षी त्याची सर्व फळे पवित्र होतील, याहवेहच्या स्तुतीप्रीत्यर्थ ते द्यावे.
परंतु पाचव्या वर्षी ती फळे तुम्ही खावी. अशा प्रकारे तुमचे पीक वाढेल. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘मृत्यू पावलेल्यासाठी तुम्ही आपल्या शरीरावर जखमा करून घेऊ नये किंवा शरीर गोंदून घेऊ नये. मी याहवेह आहे.
“ ‘तुम्ही माझे शब्बाथ पाळावे आणि माझ्या पवित्र स्थानाविषयी आदर बाळगावा; मी याहवेह आहे.
“ ‘तुम्ही शकुनविद्या, ज्योतिष किंवा चेटक्यांची सल्लामसलत घेऊन स्वतःला भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘परमेश्वराची भीती बाळगून आपल्यापेक्षा वडील माणसांपुढे उभे राहून त्यांना मान द्या. त्यांना आदर दाखवा, मी याहवेह आहे.
जे परदेशी तुमच्यामध्ये राहत आहेत ते तुमच्या स्वदेशीय सारखेच आहेत, असे समजून तुम्ही त्यांना वागवावे. जशी स्वतःवर तशी त्यांच्यावर प्रीती करावी, कारण तुम्हीही इजिप्त देशात विदेशी होता. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
तोलण्यात खरे तराजू आणि वजन उपयोगात आणावे आणि मापण्यात तुम्ही खरे एफा आणि हीन उपयोगात आणावे; कारण ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले तो याहवेह मी तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘माझे सर्व विधी आणि माझे सर्व नियम याकडे तुम्ही लक्ष द्यावे आणि त्यांचे पालन करावे. मी याहवेह आहे.’ ”
याहवेह मोशेला म्हणाले,
मी स्वतः त्या मनुष्याच्या विरुद्ध माझे मुख फिरवेन व लोकातून त्याच्या उच्छेद करेन; कारण त्याने आपले मूल मोलख दैवताला बळी देऊन व माझे पवित्रस्थान भ्रष्ट करून माझ्या पवित्र नावाचा अपमान केला आहे.
मी स्वतः त्याच्याविरुद्ध व त्याच्या घराण्याविरुद्ध मुख फिरवेन आणि मोलखबरोबर व्यभिचार करून त्याचे अनुकरण करणार्या सर्वांचा त्यांच्या लोकांतून नाश करेन.
“ ‘शकुनविद्या आणि चेटक्यांची अनुसरण करून स्वतःला वेश्या करण्याचा प्रयत्न करणार्यांकडून मी माझे मुख फिरवेन आणि मी त्याचा त्याच्या लोकांमधून उच्छेद करेन.
“ ‘तुम्ही स्वतःस शुद्ध राखून पवित्र राहावे, कारण मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
तुम्ही माझे नियम पाळा आणि त्याचे पालन करा. मी याहवेह आहे, जो तुम्हाला पवित्र करतो.
“ ‘तुम्ही माझे विधी व नियम पाळले तर मी वस्ती करून राहण्यासाठी ज्या देशात तुम्हाला नेत आहे, ती भूमी तुम्हाला बाहेर ओकून देणार नाही.
ज्या राष्ट्रांना मी तुमच्यापुढून घालवून देत आहे, त्या राष्ट्रांचे रीतिरिवाज तुम्ही पाळू नयेत, कारण त्यांनी ही दुष्कर्मे केली म्हणून मला त्यांचा तिरस्कार आहे.
परंतु मी तुम्हाला म्हणालो, “तुम्ही त्यांच्या देशाचे मालक व्हाल; मी तुम्हाला तो वारसाप्राप्त संपत्ती असे देईन, दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा तो देश आहे.” तुम्हाला इतर राष्ट्रांपासून वेगळे राखणारा, मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.
“ ‘तुम्हाला शुद्ध आणि अशुद्ध प्राणी, शुद्ध आणि अशुद्ध पक्षी यांच्यात स्पष्ट फरक करावा लागेल; कोणत्याही पशू, पक्षी किंवा जमिनीवर सरपटणार्या प्राण्यामुळे स्वतःला अशुद्ध करू नका, ज्यांना मी तुमच्यासाठी अशुद्ध म्हणून वेगळे केले आहे.