मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याजकाने सभामंडपाच्या दाराशी असलेल्या याहवेहच्या वेदीवर रक्त शिंपडून याहवेहला सुवास म्हणून त्यांच्या चरबीचा होम करावा.

  2. आणि याहवेहसाठी सभामंडपाच्या दाराशी तो प्राणी अर्पण करण्यास आणला नाही, तर त्याला आपल्या लोकांमधून बहिष्कृत करावे.

  3. इस्राएलांच्या घराण्यातील कोणीही किंवा त्यांच्यामध्ये राहणारा कोणताही विदेशी, जो रक्त खातो त्या माणसाविरुद्ध मी माझे मुख फिरवेन आणि मी त्यांना लोकांमधून बहिष्कृत करेन.

  4. कारण शरीराचे जीवन रक्तात असते आणि तुमच्या प्रायश्चित्तासाठी मी तुम्हाला वेदीवर शिंपडण्यासाठी ते दिले आहे; रक्तात जीवन असल्यामुळे प्रायश्चित्त होते.

  5. म्हणून मी इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुमच्यामधील कोणीही किंवा तुमच्यामध्ये राहणारा विदेशी यापैकी कोणीही रक्ताचे सेवन करू नये.”

  6. कारण रक्त हे प्रत्येक प्राण्याचे जीवन आहे. म्हणून इस्राएली लोकांना सांगितले आहे, “तुम्ही कोणत्याही प्राण्याचे रक्त खाऊ नका, कारण प्रत्येक प्राण्याचे जीवन हे त्याचे रक्त आहे; जो कोणी रक्ताचे सेवन करेल त्याला बहिष्कृत केलेच पाहिजे.”

  7. याहवेह मोशेला म्हणाले,

  8. “इस्राएली लोकांबरोबर बोल आणि त्यांना सांग: ‘मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  9. तुम्ही ज्या इजिप्त देशात राहिलात त्यांच्यासारखे वागू नका आणि मी तुम्हाला जिथे नेत आहे, त्या कनान देशाचे लोक जे करतात ते करू नका. त्यांच्या रीतिरिवाजाचे पालन करू नका.

  10. तुम्ही माझ्या नियमांचे पालन केलेच पाहिजे आणि काळजीपूर्वक माझ्या आज्ञांप्रमाणे वागले पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  11. तुम्ही माझ्या आज्ञा आणि नियमांचे पालन करा, कारण जो व्यक्ती त्यांचे पालन करतो, तो त्यामुळे जिवंत राहील. मी याहवेह आहे.

  12. “ ‘तुमच्यापैकी कोणीही आपल्या जवळच्या नातलगाशी शारीरिक संबंध ठेऊ नये; मी याहवेह आहे.

  13. “ ‘तू आपल्या संतानांपैकी कोणालाही मोलख दैवतासाठी यज्ञबली म्हणून अर्पण करू नये, कारण असा यज्ञ केल्याने तुझ्या परमेश्वराच्या नावाचा अनादर होतो. मी याहवेह आहे.

  14. “ ‘अशा प्रकारच्या कोणत्याही अमंगळ गोष्टी करून तुम्ही स्वतःला अपवित्र करून घेऊ नये, कारण ज्या राष्ट्रात मी तुम्हाला पाठवित आहे, ती राष्ट्रे या गोष्टींनी भ्रष्ट झाली आहेत.

  15. भूमीसुद्धा भ्रष्ट झाली होती; म्हणून तिच्या पापाबद्दल मी तिला शिक्षा केली आहे, भूमीने तेथील रहिवाशांना देशाबाहेर ओकारीसारखे फेकून दिले आहे.

  16. म्हणून तुम्ही माझे नियम व विधी पाळा आणि वर उल्लेख केलेल्या कोणत्याही ओंगळ गोष्टी करू नका. हे नियम इस्राएली लोकांना व तुमच्यात राहत असलेल्या विदेशी लोकांनाही लागू आहेत,

  17. म्हणून तुम्ही जात आहात, तेथील लोकांच्या ओंगळ कृत्यांचे अनुकरण करून तुम्ही स्वतःस भ्रष्ट करून घेऊ नये; मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.’ ”

  18. याहवेह मोशेला म्हणाले,

  19. “सर्व इस्राएली लोकांस सांग: ‘तुम्ही पवित्र असावे, कारण मी, याहवेह तुमचा परमेश्वर, पवित्र आहे.

  20. “ ‘तुमच्यातील प्रत्येकाने आपल्या आईवडिलांचा आदर केला पाहिजे आणि माझा शब्बाथ पाळलाच पाहिजे. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  21. “ ‘मूर्तीकडे वळू नका आणि आपल्यासाठी ओतीव देव करू नका. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  22. “ ‘जेव्हा तुम्ही याहवेहला शांत्यर्पणे करता, तेव्हा ती अशा प्रकारे अर्पण करा की तुमच्यावतीने मान्य करण्यात येतील.

  23. जो कोणी ते खाईल तो दोषी ठरेल, कारण ज्यागोष्टी याहवेहला पवित्र आहेत, त्याला त्यांनी अपवित्र केले आहे. अशा व्यक्तीला त्यांच्या लोकांमधून बहिष्कृत करावे.

  24. तुमच्या द्राक्षमळ्यावर दुसर्‍यांदा जाऊ नका अथवा पडलेली द्राक्षे गोळा करू नका. गोरगरिबांसाठी आणि परदेशीयांसाठी ती तिथेच राहू द्यावी. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे.

  25. “ ‘तुम्ही माझ्या नावाने खोटी शपथ वाहू नये आणि तुमच्या परमेश्वराचे नाव अपवित्र करू नये. मी याहवेह आहे.