मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. मग याजकाने दोषार्पणाचे कोकरू व अर्धा लीटर तेल घेऊन वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसाठी ओवाळावे.

  2. आणि याजकाने आपल्या उजव्या हाताच्या बोटांनी सात वेळा ते याहवेहपुढे शिंपडावे.

  3. याजकाने त्याच्या तळहातावर उरलेले तेल त्या शुद्ध होणार्‍या माणसाच्या प्रायश्चित्तासाठी याहवेहपुढे त्याच्या डोक्यास लावावे.

  4. एक पक्ष्याचे पापार्पण म्हणून व दुसर्‍या पक्ष्याचे अन्नार्पणासह होमार्पण म्हणून अर्पणे करावी. अशाप्रकारे याजकाने शुद्ध होणार्‍या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.”

  5. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  6. “जेव्हा तुम्ही कनान देशात प्रवेश कराल, जो मी तुम्हाला वतन म्हणून दिला आहे, आणि मी तेथील एखाद्या घराला कुष्ठरोगाचा चट्टा देईन,

  7. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  8. आठव्या दिवशी त्याने दोन होले किंवा पारव्याची दोन पिल्ले घ्यावीत व सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर येऊन याजकाला ती द्यावीत.

  9. याजकाने त्यातील एका पक्ष्याचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण करावे. अशाप्रकारे याजकाने त्याच्या स्त्रावासाठी याहवेहसमोर प्रायश्चित करावे.

  10. याजकाने एकाचे पापार्पण व दुसर्‍याचे होमार्पण म्हणून याहवेहपुढे अर्पून तिच्या स्त्रावाच्या अशुद्धतेकरिता प्रायश्चित्त करावे.

  11. अहरोनाचे दोन पुत्र याहवेहच्या समक्षतेत गेल्यामुळे मरण पावल्यानंतर याहवेह मोशेबरोबर बोलले.

  12. याहवेह मोशेला म्हणाले, “तुझा भाऊ अहरोन याला सांग की कोश व प्रायश्चिताचे झाकण असलेल्या पडद्यामागील परमपवित्रस्थानात त्याची इच्छा होईल तेव्हा येऊ नये, नाही तर त्याला मरण येईल. कारण दयासनावरील ढगात मी प्रकट होत राहीन.

  13. मग त्याने सभामंडपाच्या दाराशी याहवेहपुढे ती दोन बोकडे आणावी.

  14. दोन बोकडांवर अहरोनाने चिठ्ठ्या टाकाव्या—याहवेहसाठी एक बोकड आणि पाप वाहून नेण्यासाठी दुसरा बोकड.

  15. नंतर याहवेहसाठी चिठ्ठी पडलेल्या बोकडाला अहरोनाने घेऊन यावे आणि पापार्पणाचा बळी म्हणून त्याचा यज्ञ करावा.

  16. परंतु चिठ्ठी टाकून जो दुसरा बोकड आला तो पाप वाहून नेण्यासाठीचा बोकड जिवंत ठेवून याहवेहसमोर आणावा आणि त्याच्यावर प्रायश्चित्ताचा विधी करून, पाप वाहून नेण्यासाठी तो रानात सोडून द्यावा.

  17. याहवेहच्या वेदीसमोरील धुपाटण्यात जळते निखारे भरून घ्यावेत व कुटून बारीक केलेला व दोन मुठीत भरेल एवढा सुगंधी धूप अंतरपटाच्या आत आणावा.

  18. तो धूप त्याने याहवेहसमोर निखार्‍यांवर असा टाकावा की, धूपाच्या धुराने दहा आज्ञांच्या दगडी पाट्या ठेवलेला कोश व त्यावरील दयासन व्यापून जाईल; म्हणजे तो मरणार नाही.

  19. “मग त्याने तिथून निघून याहवेहसमोरील वेदीजवळ जाऊन तिच्यासाठी प्रायश्चित्त करावे. त्याने गोर्‍ह्याचे व बोकडाचे रक्त घेऊन ते वेदीच्या चारही बाजूच्या शिंगांना लावावे.

  20. कारण या दिवशी तुम्हाला शुद्ध करण्यासाठी तुमच्यासाठी प्रायश्चित्त केले जाईल, तुम्ही याहवेहसमोर तुमच्या सर्व पापांपासून शुद्ध व्हाल.

  21. “तुझ्यासाठी हा नेहमीचा नियम असेल: इस्राएली लोकांच्या सर्व पापांसाठी वर्षातून एकदा प्रायश्चित्त करावे.” याहवेहने मोशेला दिलेल्या आज्ञेप्रमाणे हे करण्यात आले.

  22. याहवेह मोशेला म्हणाले,

  23. “अहरोन, त्याचे पुत्र आणि सर्व इस्राएली लोकांसाठी याहवेहने ज्या आज्ञा दिल्या त्या या आहेत:

  24. परंतु याहवेहच्या निवासमंडपासमोर आणि तो प्राणी सभामंडपाच्या दाराशी याहवेहला अर्पण करण्याकरिता आणला नाही, तर त्या मनुष्याला रक्तपाताचा दोष लागेल; त्याने रक्त सांडले आहे, म्हणून त्याला आपल्या लोकातून बहिष्कृत करावे.

  25. या आज्ञेचा उद्देश असा आहे की, इस्राएली लोक जे उघड्या मैदानात यज्ञपशू मारीत होते, ते त्यांनी सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे याहवेहपुढे आणावे आणि शांत्यर्पणाचे यज्ञ म्हणून याहवेहला अर्पण करावे.