मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. याहवेहपासून अग्नी येऊन त्याने वेदीवरील होमार्पण व चरबीही भस्म केली. जेव्हा लोकांनी ते पाहिले तेव्हा त्यांनी मोठ्या आवाजाने जयजयकार केला आणि जमिनीवर लोटांगण घातले.

  2. अहरोनाचे पुत्र नादाब व अबीहू यांनी आपआपल्या धुपाटण्यात अग्नी भरून, त्यावर धूप ठेवून तो अनाधिकृत अग्नी याहवेहसमोर नेला, जे याहवेहच्या आज्ञेविरुद्ध होते.

  3. म्हणून याहवेहकडून अग्नी निघाला आणि त्याने त्यांना भस्म केले आणि ते याहवेहसमोर मरण पावले.

  4. तेव्हा मोशे अहरोनास म्हणाला, “याहवेहने जे सांगितले ते असे: “ ‘जे माझ्याजवळ येतात त्यांना मी दाखवेन की मी पवित्र आहे; सर्व लोकांसमक्ष माझे गौरव होईल.’ ” यावर अहरोन शांत राहिला.

  5. मग मोशे अहरोन व त्याचे पुत्र एलअज़ार व इथामार यांना म्हणाला, “तुमचे केस न विंचरलेले असे मोकळे सोडू नका व तुमची वस्त्रे कधी फाडू नका, नाहीतर तुम्ही मराल आणि याहवेह तुम्हा सर्व समुदायावर रागावतील. परंतु तुमचे नातेवाईक, सर्व इस्राएली लोक याहवेहनी अग्नीने नाश केलेल्या लोकांबद्दल शोक करतील.

  6. सभामंडपाचे प्रवेशद्वार सोडू नका, नाही तर तुम्ही मराल, कारण याहवेहच्या अभिषेकाचे तेल तुम्हावर आहे.” तेव्हा त्यांनी मोशेच्या आज्ञेप्रमाणे केले.

  7. मग याहवेहने अहरोनाला आज्ञा दिली,

  8. आणि याहवेहने मोशेद्वारे दिलेल्या आज्ञांचे शिक्षण इस्राएली लोकांना देणे हे तुमचे कर्तव्य राहील.”

  9. अहरोन आणि त्याचे जिवंत राहिलेले पुत्र एलअज़ार आणि इथामारला मोशे म्हणाला, “खमिराशिवाय तयार केलेल्या अन्नार्पणातून उरलेले धान्यार्पण घेऊन याहवेहला अर्पण करा आणि ते तुम्ही वेदीजवळ बसून खावे, कारण ते परमपवित्र आहे.

  10. ते तुम्ही पवित्रस्थानी बसून खावे, कारण याहवेहला अर्पण केलेल्या यज्ञपशूचा तो भाग तुमच्यासाठी व तुमच्या मुलांसाठी ठरलेला वाटा आहे; कारण मला तशी आज्ञा देण्यात आली आहे.

  11. मग मोशे पुढे म्हणाला, मांडी व ऊर दोन्ही चरबीसह याहवेहसमोर आणावी व ती झोके देऊन परमेश्वराला अर्पण करावी. याहवेहनी आज्ञा दिल्याप्रमाणे हे सर्व भाग सर्वकाळ तुमच्या व तुमच्या मुलांचा वाटा समजावे.”

  12. “तुम्ही पापबली पवित्रस्थानात का खाल्ला नाही? ते परमपवित्र आहे; आणि समुदायाची पापे दूर करण्यासाठी आणि याहवेहसमोर त्यांच्याकरिता प्रायश्चित्त करण्यासाठी याहवेहने ते तुम्हाला दिले आहे.

  13. तेव्हा अहरोन मोशेला म्हणाला, “पाहा त्यांनी आजच त्यांचे पापार्पण व होमार्पण परमेश्वराला अर्पण केले, म्हणून मजवर अशा आपत्ती ओढविल्या. तेव्हा आज मी माझ्या दुःखाच्या दिवसात तो पापबली खाल्ला असता, तर ते याहवेहला आवडले असते काय?”

  14. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  15. मी याहवेह तुमचा परमेश्वर आहे; म्हणून तुम्ही स्वतःस पवित्र ठेवावे. मी पवित्र आहे, म्हणून तुम्हीही पवित्र राहावे. म्हणून तुम्ही जमिनीवर सरपटणार्‍या कोणत्याही प्राण्याला स्पर्श करून स्वतःस विटाळवून घेऊ नये.

  16. मी याहवेह आहे, ज्याने तुम्हाला इजिप्त देशातून बाहेर आणले यासाठी की मी तुमचा परमेश्वर असावा; म्हणून पवित्र व्हा, कारण मी पवित्र आहे.

  17. याहवेह मोशेला म्हणाले,

  18. याजक याहवेहला ते अर्पण करून तिच्यासाठी प्रायश्चित्त करेल म्हणजे बाळंतपणात होणार्‍या रक्तस्त्रावापासून ती विधिपूर्वक शुद्ध होईल. पुत्र किंवा कन्या झालेल्या स्त्री विषयी हा विधिनियम आहे.

  19. याहवेह मोशे व अहरोन यांना म्हणाले,

  20. याहवेह मोशेला म्हणाले,

  21. मग शुद्ध जाहीर करणार्‍या याजकाने शुद्ध होणार्‍या मनुष्यास सभामंडपाच्या दाराशी याहवेहसमोर उभे करावे.

  22. नंतर याजकाने एक कोकरू व एकतृतीयांश लीटर जैतुनाचे तेल दोषार्पण म्हणून वेदीपुढे ओवाळणीचे अर्पण म्हणून याहवेहसमोर ओवाळावे.

  23. व याजकाने त्यात आपल्या उजव्या हाताची बोटे बुडवून ते याहवेहपुढे सात वेळा शिंपडावे.

  24. याजकाच्या तळहातावर शिल्लक राहिलेले सर्व तेल शुद्ध ठरविण्याच्या माणसाच्या मस्तकास लावावे. अशाप्रकारे याजकाने त्या माणसासाठी याहवेहपुढे प्रायश्चित्त करावे.

  25. “प्रायश्चित्तविधीसाठी त्याने आपल्या शुद्धीकरणासाठी आठव्या दिवशी ते पक्षी याहवेहसमोर सभामंडपाच्या दाराशी याजकाकडे आणावेत.