मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि दंड म्हणून त्यांनी याजकाकडे, म्हणजेच याहवेहसाठी, कळपातून एक निर्दोष व योग्य किमतीचा एक मेंढा दोषार्पण म्हणून आणावा.

  2. याप्रकारे त्यांच्यासाठी याजक याहवेहसमोर प्रायश्चित करेल आणि ज्या गोष्टींमुळे ते दोषी झाले असतील, त्याबद्दल त्यांना क्षमा केली जाईल.”

  3. याहवेह मोशेला म्हणाले,

  4. “अन्नार्पणासंबंधी नियम आहेत ते हे: अहरोनाच्या पुत्रांनी याहवेहसमोर वेदीपुढे अर्पण करावे.

  5. मग याजकांनी सुगंधी मसाले व जैतुनाचे तेल व धूप घ्यावा आणि मळलेला अन्नार्पणातील मूठभर सपीठ घ्यावे व संपूर्ण अर्पणाचा स्मरणभाग म्हणून वेदीवर त्याचे हवन करावे. हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असेल.

  6. तो खमिरासह भाजू नये. मला अर्पिलेल्या होमार्पणाचा हा भाग मी माझ्या अर्पणातून याजकांना त्यांचा वाटा म्हणून दिला आहे. दोषार्पण व पापार्पण त्याप्रमाणेच हे देखील परमपवित्र आहे.

  7. अहरोनाच्या संतानांतील फक्त पुरुषांनी ते खावे आणि याहवेहला अर्पिलेला अन्नार्पणाचा हा भाग त्यांच्यासाठी पिढ्यान् पिढ्या कायमचा वाटा राहावा. जे कोणी यास स्पर्श करतील, ते पवित्र गणले जातील.”

  8. याहवेह मोशेला हे देखील म्हणाले,

  9. “ज्या दिवशी अहरोन व त्याच्या पुत्रांचा याजकीय सेवेसाठी अभिषेक होईल, त्या दिवशी त्यांनी एफाचा दहावा हिस्सा उत्तम सपीठ, अर्धे सकाळी व अर्धे सायंकाळी, अन्नार्पण म्हणून नेमाने याहवेहला अर्पावे.

  10. ते अन्नार्पण तव्यावर तेलात चांगले परतावे आणि मग याहवेहला अर्पण म्हणून आणावे, कारण हा याहवेहला प्रसन्न करणारा सुगंध असे अर्पण आहे.

  11. त्याच्या पुत्रांपैकी जो पुत्र त्याच्या जागी अभिषिक्त याजक म्हणून नियुक्त होईल तो ते तयार करेल. याहवेहचा हा वाटा सर्वकाळचा आहे आणि तो पूर्णपणे जाळून टाकावा.

  12. याहवेह मोशेला म्हणाले,

  13. “अहरोन व त्याच्या पुत्रांना सांग, पापार्पणासंबंधी नियम हे आहेत: ज्या स्थळी होमार्पणाच्या पशूंचा वध करतात त्याच स्थळी या पापार्पणाच्या पशूचाही याहवेहसमोर वध करावा. हे परमपवित्र आहे.

  14. आणि याजकाने या सर्वांचे याहवेहला अन्नार्पण म्हणून वेदीवर हवन करावे. हे दोषार्पण होय.

  15. “याहवेहसाठी कोणाला शांत्यर्पणाचा यज्ञ करावयाचा असेल तर त्याचा विधी असा:

  16. या अर्पणातील काही भाग संपूर्ण अर्पणाचे अंशात्मक प्रतीक म्हणून प्रत्येक प्रकारची भाकर वेदीपुढे याहवेहला अर्पण करावी, म्हणजे याजक जो वेदीवर शांत्यर्पणाचे रक्त शिंपडतो त्या याजकाचाच त्यावर हक्क असेल.

  17. परंतु जर कोणी विधिनियमानुसार अशुद्ध असताना शांत्यर्पणातील कोणतेही मांस जे याहवेहचे आहे ते खाईल, तर त्यांना त्यांच्या लोकांमधून काढून टाकावे.

  18. जर कोणी विधिनियमांनुसार अशुद्ध वस्तूला स्पर्श करेल—मानवासंबंधीची अशुद्धता किंवा अशुद्ध पशू वा सरपटणार्‍या अशुद्ध पशूला स्पर्श करेल व नंतर याहवेहस अर्पित शांत्यर्पणाचे सेवन करेल, त्याचा लोकातून उच्छेद व्हावा.’ ”

  19. याहवेह मोशेला म्हणाले,

  20. याहवेहला केलेल्या होमार्पणातील चरबी जो कोणी खाईल, त्याचा त्यांच्या लोकातून उच्छेद व्हावा.

  21. याहवेह मोशेला म्हणाले,

  22. इस्राएली लोकांस सांग: जो कोणी याहवेहसाठी शांत्यर्पण आणेल, त्याने त्याचा काही भाग याहवेहला अर्पणासाठी वेगळा आणावा.

  23. त्याने तो स्वहस्ते याहवेहस अर्पण करावा. चरबी व ऊर यांचे अर्पण आणून वेदीसमोर ओवाळले जाऊन ते याहवेहला ओवाळणीचे अर्पण करावे.

  24. कारण ओवाळणीचा ऊर आणि समर्पणाची मांडी ही इस्राएली लोकांतर्फे याजक अहरोन आणि त्याच्या पुत्रांना दिली आहेत. शांत्यर्पणाचा हा भाग त्यांचा सर्वकाळचा वाटा म्हणून देण्यात यावा.

  25. होमार्पणातील हा भाग याहवेहची सेवा करण्यासाठी नेमलेल्या सर्व याजकांना, म्हणजेच अहरोन व त्याच्या पुत्रांना दिला पाहिजे.