मुख्य मजकुरावर जा

God

11,427 वचने · 2 कुटुंब सदस्य

God चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि तुमच्या दोन तुकड्या ज्या शब्बाथ दिवसात कार्यासाठी नियुक्त करण्यात आल्या आहेत, त्यांनी राजाकरिता याहवेहच्या मंदिराचे रक्षक म्हणून उभे राहावे.

  2. याहवेहच्या मंदिरामधील दावीद राजाचे जे भाले व ढाली होत्या, त्या अधिकाऱ्यांच्या हाती दिल्या.

  3. मग यहोयादाने राजाच्या पुत्राला बाहेर आणले, त्याच्या शिरावर राजमुकुट ठेवला; त्याच्या हातामध्ये कराराची प्रत दिली आणि त्याला राजा म्हणून घोषित केले. मग त्यांनी त्याला अभिषेक केला आणि लोकांनी टाळ्या वाजविल्या व मोठ्याने जयघोष करून ते म्हणाले, “राजा चिरायू होवो!”

  4. जेव्हा अथल्याहने पहारेकर्‍यांचा आणि लोकांचा आवाज ऐकला, तेव्हा ती त्यांच्याकडे याहवेहच्या मंदिरात आली.

  5. यहोयादा याजकाने नेमणूक केलेल्या शताधिपतीच्या सेनाधिकार्‍यांना आदेश दिला: “सैन्याच्या रांगेतून तिला बाहेर काढा आणि जो कोणी तिच्यामागे जाईल त्याला तलवारीने मारा.” याजकाने म्हटले होते, “तिला याहवेहच्या मंदिरात जिवे मारले जाऊ नये.”

  6. मग यहोयादाने याहवेह आणि राजा आणि प्रजा यांच्यात एक करार केला की ते याहवेहची प्रजा असणार. त्याने राजा आणि प्रजा यांच्यामध्येही एक करारही केला.

  7. देशातील सर्व लोक बआलच्या मंदिराकडे गेले आणि त्यांनी ते तोडून टाकले. त्यांनी वेद्या आणि मूर्ती फोडून त्याचे तुकडे केले आणि बआलचा पुजारी मत्तानचा वेदींसमोर वध केला. मग यहोयादा याजकाने याहवेहच्या मंदिरावर पहारेकरी नेमले.

  8. त्याने त्याच्याबरोबर शताधिपती, गारदी, पहारेकरी आणि देशातील सर्व लोकांना घेतले आणि एकत्र जाऊन याहवेहच्या मंदिरातून राजाला खाली आणले आणि पहारेकर्‍यांच्या द्वारातून प्रवेश करीत राजवाड्यात गेले. मग राजाने राजासनावर आपले स्थान घेतले.

  9. याजक यहोयादाने जितकी वर्षे जे मार्गदर्शन केले होते तितकी वर्षे याहवेहच्या दृष्टीने योग्य ते यहोआशाने केले.

  10. यहोआश याजकांना म्हणाला, “याहवेहच्या मंदिरात पवित्र अर्पण म्हणून आणलेले सर्व पैसे, शिरगणतीत जमा केलेले पैसे, वैयक्तिक नवसातून मिळालेले पैसे आणि मंदिरात स्वेच्छेने आणलेले सर्व पैसे जमा करा.

  11. यहोयादा याजकाने एक पेटी घेतली व तिच्या झाकणाला एक छिद्र पाडले. ती पेटी त्याने याहवेहच्या मंदिराच्या प्रवेशद्वाराजवळ वेदीच्या उजव्या बाजूला ठेवली. प्रवेशद्वाराचे पहारेकरी याजक याहवेहच्या मंदिरात आणलेले सर्व पैसे पेटीत घालू लागले.

  12. जेव्हाही ते पाहत की पेटीमध्ये अधिक पैसा जमा झाला आहे, तेव्हा राजाचा चिटणीस आणि प्रमुख याजक येत आणि याहवेहच्या मंदिरात आलेला पैसा मोजून पिशव्यांत भरून ठेवीत असे.

  13. रक्कम मोजून आणि तोलून झाल्यानंतर मंदिराच्या कामावर देखरेख ठेवण्यासाठी नेमलेल्या माणसांना पैसे देण्यात येत असत. त्याद्वारे त्यांनी याहवेहच्या मंदिरावर काम करणारे सुतार आणि बांधकाम करणारे,

  14. गवंडी आणि दगड फोडणारे यांना पैसे दिले. त्यांनी याहवेहच्या मंदिराच्या दुरुस्तीसाठी लाकूड आणि दगड घडविणे केले आणि मंदिराच्या दुरुस्तीचे इतर सर्व खर्च पूर्ण केले.

  15. जो पैसा मंदिरामध्ये आणत होते याच्यात याहवेहच्या मंदिरात वापरण्यात येणारे चांदीचे पेले, कातऱ्या, वाट्या, कर्णे किंवा सोन्या-चांदीच्या इतर साहित्य यावर खर्च करण्यात आला नाही;

  16. तर हा पैसा कामगारांना पुरविला जात होता जे याहवेहच्या मंदिराची डागडुजी करीत होते.

  17. त्याचप्रमाणे दोषार्पणाचा आणि पापार्पणाचा पैसा याहवेहच्या मंदिरात आणला नाही; तो याजकांचा होता.

  18. तेव्हा यहूदीयाचा राजा यहोआशने आपले पूर्वज म्हणजे—यहोशाफाट, यहोराम, अहज्याह या यहूदीयाच्या राजांनी—आणि त्याने स्वतः समर्पित केलेल्या भेटवस्तू आणि याहवेहच्या मंदिरातील राजवाड्याच्या खजिन्यातील सर्व सोने त्याने अरामचा राजा हजाएलकडे पाठवून दिले. मग तो यरुशलेममधून निघून गेला.

  19. पण त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले. नेबाटाचा पुत्र यरोबोअमने इस्राएलांकडून जी पातके करविली ती त्याने अनुसरली आणि त्यापासून तो मागे फिरला नाही.

  20. त्याच्या पातकांमुळे याहवेहचा क्रोध इस्राएलावर भडकला आणि त्यांनी त्याला अरामचा राजा हजाएल आणि त्याचा पुत्र बेन-हदादच्या अधीनतेमध्ये बराच काळ ठेवले.

  21. तेव्हा यहोआहाजाने याहवेहकडे विनवणी केली आणि याहवेहने त्याचे ऐकले, कारण अरामचा राजा इस्राएलाचा अत्यंत क्रूरपणे छळ करीत होता हे त्यांनी पाहिले.

  22. याहवेहने इस्राएली लोकांना सोडविणारा पाठविला आणि त्यांची अरामी लोकांपासून सुटका झाली. त्यानंतर इस्राएली लोक पूर्वीप्रमाणेच आपआपल्या घरात राहू लागले.

  23. त्याने याहवेहच्या दृष्टीने वाईट ते केले आणि नेबाटाचा पुत्र यरोबोअमच्या पातकांपासून मागे फिरला नाही; जी पातके त्याने इस्राएली लोकांना करण्यास लावली होती, ती तो करत राहिला.

  24. “पूर्वेकडील खिडकी उघड.” असे अलीशाने म्हटले आणि त्याने ती उघडली. तेव्हा अलीशा म्हणाला, “बाण सोड!” आणि त्याने बाण सोडला. तेव्हा अलीशाने जाहीर केले, “हा याहवेहचा विजयी बाण, अरामावर विजय मिळवून देणारा बाण आहे. तू अफेक येथे अरामी लोकांचा संपूर्ण नाश करशील.”

  25. परमेश्वराचा मनुष्य त्याच्यावर रागावला आणि म्हणाला, “तू पाच किंवा सहा बाण जमिनीवर सोडावयास हवे होतेस; तेव्हा तू अरामचा पराभव आणि पूर्ण नाश केला असतास. परंतु आता तू फक्त तीन वेळाच त्यांचा पराभव करशील.”