मुख्य मजकुरावर जा

Elijah

92 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Elias

Elijah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नंतर शिष्यांनी येशूंना विचारले, “एलीयाह प्रथम आला पाहिजे, असे नियमशास्त्राचे शिक्षक का म्हणतात?”

  2. येशूंनी उत्तर दिले, “एलीयाह प्रथम येईल व सर्वकाही व्यवस्थित करेल याची खात्री बाळगा. पण मानवपुत्राने पुष्कळ दुःखे सहन करावीत आणि तुच्छ मानले जावे असे कशाला लिहिले आहे?

  3. पण मी तुम्हाला सांगतो, एलीयाह आलेला आहे आणि त्याच्याविषयी जसे लिहून ठेवले आहे, त्यानुसार त्यांच्या इच्छेप्रमाणे त्यांनी त्याला वाटेल तसे वागविले आहे.”

  4. तिथे जवळ उभे असलेल्या काही लोकांनी हे ऐकले व ते म्हणाले, “पाहा, तो एलीयाहला बोलावित आहे.”

  5. कोणी एक धावला, शिरक्यात भिजविलेला, एक स्पंज काठीवर ठेवून येशूंना प्यावयास दिला व तो म्हणाला, “त्याला एकटे सोडा. एलीयाह त्याला खाली उतरविण्यास येतो की काय, हे आपण पाहू!”

  6. तो एलीयाहच्या आत्म्याने व सामर्थ्याने प्रभूच्या पुढे चालेल, आईवडिलांची हृदये त्यांच्या लेकरांकडे वळवेल व अवज्ञा करणार्‍यांना नीतिमानांच्या ज्ञानाकडे वळवेल व लोकांना प्रभूच्या मार्गाप्रमाणे चालण्यासाठी तयार करेल.”

  7. हे मी खात्रीपूर्वक सांगतो, जेव्हा साडेतीन वर्षे आकाश बंद झाले व सर्व देशभर भयंकर दुष्काळ पडला होता, त्यावेळी इस्राएलमध्ये एलीयाहच्या काळात अनेक विधवा होत्या.

  8. तरीही एलीयाहला कोणाकडे पाठविले नाही, पण सीदोन प्रदेशातील सारफथ येथील विधवेकडे पाठविले.

  9. आणखी दुसरे म्हणत होते की एलीयाह प्रकट झाला आहे, तर आणखी काही प्राचीन संदेष्ट्यांपैकी एक संदेष्टा मृतातून उठून उदय पावला आहे असे म्हणत होते.

  10. ते म्हणाले, “काही म्हणतात बाप्तिस्मा करणारा योहान; काही एलीयाह; आणखी काहीजण म्हणतात, आपण मरणातून उठलेले प्राचीन काळातील संदेष्ट्यांपैकी एक आहात.”

  11. मग दोन पुरुष म्हणजे स्वतः मोशे आणि एलीयाह तिथे प्रकट झाले आणि येशूंबरोबर संवाद करू लागले.

  12. मग मोशे व एलीयाह येशूंना सोडून जात असताना, पेत्र येशूंना म्हणाले, “गुरुजी, आपल्याला येथेच राहता आले, तर फार चांगले होईल! आपण येथे तीन मंडप—एक तुमच्यासाठी, एक मोशेसाठी आणि एक एलीयाहसाठी बांधू या.” त्याला काय बोलावे हे समजत नव्हते.

  13. जेव्हा याकोब आणि योहान या शिष्यांनी हे पाहिले, ते म्हणाले, “प्रभूजी, त्या लोकांना भस्म करण्यासाठी आम्ही स्वर्गातून अग्नीची मागणी करावी काय?”

  14. त्यावर त्यांनी परत विचारले, “मग तुम्ही कोण आहात? तुम्ही एलीयाह आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.” “मग आपण संदेष्टा आहात काय?” त्याने उत्तर दिले, “नाही.”

  15. त्यांनी प्रश्न विचारला, “तुम्ही ख्रिस्त नाही, एलीयाह नाही व संदेष्टाही नाही तर तुम्ही बाप्तिस्मा का करता?”

  16. ज्यांच्याविषयी पूर्वज्ञान होते अशा आपल्या लोकांचा परमेश्वराने त्याग केला नाही. वचनामध्ये एका भागात एलीयाहबद्दल म्हटले, ते तुम्हाला माहीत नाही का—इस्राएलविरुद्ध परमेश्वराजवळ त्याने कशी विनंती केली:

  17. एलीयाह अगदी आपल्यासारख्या स्वभावाचा मनुष्य होता. त्याने पाऊस पडू नये अशी कळकळीने प्रार्थना केली आणि साडेतीन वर्षे भूमीवर पाऊस पडला नाही.