मुख्य मजकुरावर जा

Elijah

92 वचने

हे नावानेही ओळखले जाते: Elias

Elijah चा उल्लेख असलेली वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. आणि एलीयाहने अहाबास म्हटले, “जा, खा व पी, कारण मला मुसळधार पावसाचा आवाज येत आहे.”

  2. म्हणून अहाब खाण्यापिण्यास गेला, परंतु एलीयाह कर्मेल डोंगराच्या माथ्यावर गेला आणि त्याने जमिनीपर्यंत लवून आपले तोंड आपल्या गुडघ्यांमध्ये घातले.

  3. याहवेहचे सामर्थ्य एलीयाहवर आले आणि तो आपली कंबर बांधून अहाबापुढे येज्रीलपर्यंत धावत गेला.

  4. एलीयाहने जे काही केले आणि त्याने बआलाच्या सर्व संदेष्ट्यांना तलवारीने कसे मारून टाकले ते अहाबाने ईजबेलला सांगितले.

  5. तेव्हा ईजबेलने एलीयाहकडे असे म्हणत एक दूत पाठवला, “उद्या या वेळेपर्यंत मी त्यांच्यातील एकाप्रमाणे तुझ्या जिवाचे केले नाही तर देव माझे त्याहूनही अधिक वाईट करो.”

  6. तिथे तो गुहेत जाऊन रात्रभर तिथेच राहिला. आणि याहवेहचे वचन त्याच्याकडे आले: “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”

  7. जेव्हा एलीयाहने ही वाणी ऐकली, त्याने आपल्या झग्याने आपला चेहरा झाकून घेतला आणि बाहेर जाऊन गुहेच्या तोंडाशी जाऊन उभा राहिला. मग ती वाणी त्याला म्हणाली, “एलीयाह, तू येथे काय करीत आहेस?”

  8. म्हणून एलीयाह तिथून निघाला आणि त्याला शाफाटचा पुत्र अलीशा दिसला. नांगराला बारा बैल जुंपून तो नांगरणी करीत होता आणि तो स्वतः बाराव्या बैलाच्या जोडीवर होता. एलीयाह त्याच्याकडे गेला व आपला झगा त्याच्यावर टाकला.

  9. तेव्हा अलीशाने आपले बैल सोडले आणि एलीयाहच्या मागे धावून गेला. तो म्हणाला, “मला माझ्या आईपित्याचे चुंबन घेऊ दे, मग मी आपल्याबरोबर येईन.” एलीयाहने उत्तर दिले, “परत जा, मी तुला काय केले?”

  10. तेव्हा अलीशा त्याच्यापासून निघून परतला. त्याने आपल्या बैलाची एक जोडी घेतली आणि ती कापली. त्याने नांगरणीची साधने पेटवून त्यावर मांस शिजविले आणि लोकांना दिले आणि त्यांनी ते खाल्ले. मग तो एलीयाहचा अनुयायी होण्यास निघाला आणि त्याचा सेवक झाला.

  11. त्यानंतर तिश्बीचा एलीयाहकडे याहवेहचे वचन आले:

  12. अहाब एलीयाहला म्हणाला, “हे माझ्या वैर्‍या, शेवटी तू मला शोधलेच!” तो म्हणाला, “मी तुला शोधलेच, कारण याहवेहच्या दृष्टीत जे वाईट ते करण्यास तू स्वतःस विकून टाकले आहेस.

  13. नंतर एलीयाह तिश्बीकडे याहवेहचे वचन आले:

  14. परंतु याहवेहच्या दूताने तिश्बी एलीयाहला निरोप देऊन म्हटले, “वर जा आणि शोमरोनाच्या राजाच्या दूतांना भेट आणि त्यांना विचार, ‘इस्राएलमध्ये परमेश्वर नाही की काय, म्हणून तुम्ही एक्रोनचे दैवत बाल-जबूब याला विचारावयास निघाले आहात?’

  15. म्हणून याहवेह हे म्हणतात की: ‘ज्या अंथरुणावर तू पडला आहेस, त्यावरून तू उठणार नाही. तू खात्रीने मरशील!’ ” मग एलीयाह निघून गेला.

  16. त्यांनी उत्तर दिले, “त्या मनुष्याने केसाळ झगा घातला होता आणि चामड्याचा कंबरपट्टा बांधलेला होता.” राजाने म्हटले, “मग तो एलीयाह तिश्बीच असला पाहिजे.”

  17. एलीयाहने सेनाधिकार्‍याला म्हटले, “जर मी खराच परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो!” तेव्हा स्वर्गातून अग्नी उतरला आणि सेनाधिकार्‍यास व त्याच्या सर्व शिपायांना भस्म केले.

  18. एलीयाहने उत्तर दिले, “मी परमेश्वराचा मनुष्य असेन, तर स्वर्गातून अग्नी उतरो आणि तुला व तुझ्या पन्नास शिपायांना भस्म करो.” मग परमेश्वराचा अग्नी स्वर्गातून उतरला आणि त्याला व त्याच्या पन्नास माणसांना भस्म केले.

  19. यानंतर राजाने तिसर्‍या सेनाधिकार्‍यास त्याच्या पन्नास लोकांसोबत पाठविले. हा सेनाधिकारी वर गेला आणि एलीयाहपुढे गुडघे टेकून त्याला विनंती केली. “हे परमेश्वराच्या मनुष्या, तुमच्या दृष्टीत माझा जीव आणि या पन्नास माणसांचा, जे तुमचे सेवक आहेत त्यांचा जीव मोलवान असो!

  20. याहवेहच्या दूताने एलीयाहला म्हटले, “त्याला भिऊ नकोस, त्याच्यासोबत खाली जा.” तेव्हा एलीयाह उठला आणि त्याच्यासोबत राजाकडे गेला.

  21. एलीयाहद्वारे याहवेहने भविष्य केल्याप्रमाणे अहज्याह मरण पावला. अहज्याहला पुत्र नव्हता म्हणून त्याचा भाऊ योराम राजा झाला. ही घटना यहूदीयाचा राजा यहोशाफाटचा पुत्र यहोरामच्या कारकिर्दीच्या दुसर्‍या वर्षी घडली.

  22. जेव्हा याहवेहने एलीयाहला वावटळीद्वारे स्वर्गात घेऊन जाण्याचा समय आला. तेव्हा एलीयाह आणि अलीशा गिलगालहून निघाले होते.

  23. एलीयाहने अलीशाला म्हटले, “इथे थांब; याहवेहने मला बेथेलला पाठवले आहे.” परंतु अलीशा म्हणाला, “जिवंत याहवेहची शपथ आणि तुमच्या जीविताची शपथ मी आपणास सोडणार नाही.” तेव्हा ते दोघे खाली बेथेलला गेले.

  24. नंतर एलीयाह त्याला म्हणाला, “अलीशा तू येथेच राहा; कारण याहवेह मला यरीहोस पाठवित आहे.” आणि त्याने म्हटले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो, मी तुम्हाला सोडणार नाही.” तेव्हा ते दोघेही यरीहोला गेले.

  25. मग एलीयाह अलीशास म्हणाला, “तू येथेच राहा; कारण याहवेह मला यार्देनला पाठवित आहेत.” आणि त्याने उत्तर दिले, “मी याहवेहची आणि आपल्या जीविताची शपथ घेऊन सांगतो की मी तुम्हाला सोडणार नाही.” मग ते दोघेही पुढे चालले.