Skip to content
गणना ३४:१-१२

कनानच्या सीमा निश्चित

गणना ३४:१-१२
याहवेह मोशेला म्हणाले,
“इस्राएली लोकांस आज्ञा देऊन सांग: ‘जो देश तुम्हाला तुमचे वतन म्हणून दिला जाणार आहे त्या कनान देशात जेव्हा तुम्ही प्रवेश कराल तेव्हा त्याच्या सीमा अशाप्रकारे असाव्यात:
“ ‘तुमच्या दक्षिणेचा विभाग सीन रानाच्या काही भागापासून एदोमाच्या सीमेपर्यंत असावा. तुमची दक्षिणेची सीमा मृत समुद्राच्या पूर्वेच्या टोकाकडून असावी,
तिथून तुमची सीमा अक्राब्बीमच्या चढावाच्या दक्षिणेस पोचून तिथून ती पुढे सीन पर्यंत जाऊन कादेश-बरनेआच्या दक्षिणेपर्यंत आणि हाजार अद्दारपर्यंत जाऊन आजमोनास पोचावी.
आजमोनाहून ती सीमा वळून इजिप्त देशाच्या ओहोळाला जाऊन मिळेल व भूमध्य समुद्राकडे संपेल.
तुमची पश्चिमेकडील सीमा भूमध्य समुद्राचा किनारा असेल. ही तुमची पश्चिम सीमा असावी.
तुमच्या उत्तरेकडील सीमेसाठी भूमध्य समुद्रापासून होर पर्वतापर्यंत रेखा आखावी.
आणि होर पर्वतापासून लेबो हमाथपर्यंत व तिथून ती सीमा जेदादपर्यंत न्यावी.
जिफरोनपर्यंत जाऊन तिचा शेवट हाजार-एनान येथे संपेल. ही तुमची उत्तरेकडील सीमा असेल.
१०
तुमच्या पूर्वेकडील सीमेसाठी हाजार-एनानपासून शेफम पर्यंत रेखा आखावी.
११
तिथून ती सीमा शेफमपासून खाली रिब्लाह जे एईनच्या पूर्वेकडे आहे तिथपर्यंत जाईल आणि उताराला पुढे पूर्वेच्या बाजूने किन्नेरेथ समुद्रापर्यंत पोहोचेल.
१२
नंतर ती सीमा यार्देन नदीच्या कडेने जाऊन मृत समुद्राकडे तिचा शेवट होईल.’
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 90 chars

Options