- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
येशूचे खरे कुटुंब कोण?
मत्तय १२:४६-५०
येशूचे खरे कुटुंब कोण?
४६
येशू समुहाशी बोलत असताना त्यांची आई आणि भाऊ त्यांच्याशी बोलण्यासाठी बाहेर उभे राहिले होते.
४७
कोणी त्यांना सांगितले, “तुमची आई आणि तुमचे भाऊ बाहेर उभे आहेत व आपल्याशी बोलू इच्छित आहेत.”
४८
त्यांनी त्याला उत्तर दिले, “कोण माझी आई आणि कोण माझे भाऊ?”
४९
मग आपल्या शिष्यांकडे बोट दाखवित ते म्हणाले, “हे माझी आई आणि माझे भाऊ आहेत.
५०
ते पुढे म्हणाले, जो कोणी माझ्या स्वर्गीय पित्याच्या इच्छेप्रमाणे करतो, तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि माझी आई आहे.”
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
लूक ८:२१
तेव्हा ते म्हणाले, “जो कोणी परमेश्वराचे वचन ऐकतो व त्यानुसार आचरण करतो, तोच माझा भाऊ व बहीण आणि माझी आई.”वचन ४६ मधूनमार्क ३:३५
जो कोणी परमेश्वराच्या इच्छेप्रमाणे करतो तोच माझा भाऊ, तीच माझी बहीण आणि आई आहे.”वचन ४६ मधूनयोहान १५:१४
तुम्ही माझ्या आज्ञा पाळल्या, तर तुम्ही माझे मित्र आहात.वचन ५० मधूनमत्तय १३:५५
हा सुताराचा मुलगा नाही काय? याच्या आईचे नाव मरीया नाही काय, आणि याकोब, योसेफ, शिमोन आणि यहूदाह हे त्याचे भाऊ नाहीत काय?वचन ४६ मधूनयोहान २:१२
यानंतर येशू आपली आई, भाऊ आणि शिष्य यांच्याबरोबर काही दिवस खाली कफर्णहूम येथे राहण्यास गेले.वचन ४६ मधूनइब्री २:११
जो लोकांना पवित्र करतो आणि जे पवित्र झाले आहेत, ते दोन्ही एकाच कुटुंबातील आहेत. यामुळेच आपल्याला बंधू आणि भगिनी असे म्हणावयाला येशू लाजत नाही.वचन ५० मधूनइब्री २:१७
या कारणासाठी त्यांना आपल्यासारखे म्हणजे बंधूसारखे होणे व पूर्ण मानव होणे अगत्याचे होते, कारण त्यामुळेच त्यांना परमेश्वरासमोर आपला कृपाळू व विश्वासू याजक होता आले आणि मनुष्याच्या पापांबद्दल प्रायश्चित करता आले.वचन ५० मधूनलूक ११:२७
येशू बोलत असताना त्या गर्दीतील एक स्त्री ओरडून म्हणाली, “धन्य तुझी माता, जिने तुला जन्म दिला, दूध पाजले व तुझे पोषण केले!”वचन ५० मधूनलूक ११:२८
त्याने उत्तर दिले, “परंतु जे परमेश्वराचे वचन ऐकतात आणि त्याप्रमाणे आचरण करतात, ते अधिक धन्य आहेत.”वचन ५० मधूनमत्तय २८:१०
मग येशू त्यांना म्हणाले, “भिऊ नका. माझ्या भावांकडे जा, त्यांना सांगा आणि मला भेटण्यासाठी ताबडतोब गालीलात या. तिथे मी त्यांच्या दृष्टीस पडेन.”वचन ५० मधूनयोहान ७:३
येशूंचे भाऊ त्यांना म्हणाले, “तुम्ही गालीलातून निघून यहूदीयात जा, म्हणजे तेथील तुमच्या शिष्यांना जे कार्य तुम्ही करता ते पाहावयास मिळेल.वचन ४६ मधूनयोहान ७:५
कारण त्यांच्या भावांचा देखील त्यांच्यावर विश्वास नव्हता.वचन ४६ मधून



अभ्यास टीप
Settings