- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
कैसराला कर भरणे
मार्क १२:१३-१७
कैसराला कर भरणे
१३
काही काळानंतर येशूंना शब्दात पकडावे, या उद्देशाने काही परूशी व हेरोदियांना पाठविण्यात आले.
१४
ते त्याच्याकडे आले व म्हणाले, “गुरुजी, तुम्ही प्रामाणिक व्यक्ती आहात हे आम्हाला माहीत आहे. तुम्ही कोणाचे समर्थन करीत नाही, कोणाची पर्वा न करता, भेदभाव न करता, ते कोण आहेत याकडे लक्ष देत नाही व खरेपणाने परमेश्वराचा मार्ग शिकविता; तर आम्हाला सांगा, कैसराला कर देणे योग्य आहे की नाही?
१५
आम्ही कर भरावा की नाही?” परंतु येशूंनी त्यांचे ढोंग ओळखले व ते म्हणाले, “तुम्ही मला सापळ्यात का पाडू पाहता? एक दिनार आणा आणि मला दाखवा.”
१६
त्याप्रमाणे त्यांना एक नाणे दिले आणि त्यांनी विचारले, “या नाण्यावर कोणाचा मुखवटा आणि कोणाचा लेख आहे?” “कैसराचा” त्यांनी उत्तर दिले.
१७
तेव्हा प्रभू येशू म्हणाले, “जे कैसराचे आहे ते कैसराला द्या आणि जे परमेश्वराचे आहे ते परमेश्वराला द्या.” तेव्हा ते त्यांच्याविषयी आश्चर्यचकित झाले.
या उताऱ्यात
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
हे देखील पहा
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
रोमकरांस १३:७
प्रत्येकाला त्याचे जे काही देणे असेल, ते द्या: जर कर द्यायचे तिथे कर द्या, महसूल असेल तर महसूल द्या. आणि जिथे सन्मान तिथे सन्मान, जिथे आदर तिथे आदर द्या.वचन १७ मधूनलूक ११:५४
त्यांना शब्दात धरण्याची ते संधी शोधू लागले.वचन १३ मधूनलूक २०:२०
त्यांच्यावर बारकाईने पाळत ठेऊन, त्यांनी गुप्तहेरांना प्रामाणिक माणसे आहेत असे ढोंग करून त्यांच्याकडे पाठविले यासाठी की येशूंना त्यांच्या शब्दात पकडावे आणि त्यांना राज्यपालाच्या अधिकारकक्षेत आणावे.वचन १३ मधूनलूक २०:२६
अशा रीतीने लोकांपुढे त्यांना ते शब्दात पकडू शकले नाही. त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि गप्प राहिले.वचन १३ मधूनमार्क ३:६
यानंतर परूश्यांनी जाऊन येशूंना कसे जिवे मारता येईल याविषयी हेरोदियांबरोबर योजना केली.वचन १३ मधून1 पेत्र २:१७
प्रत्येकाला योग्य आदर दाखवा. विश्वासणार्यांच्या कुटुंबावर प्रीती करा. परमेश्वराचे भय बाळगा व राजाचा मान राखा.वचन १७ मधूनमार्क ८:१५
“सावध असा,” येशूंनी त्यांना इशारा दिला, “हेरोद राजा आणि परूशी लोकांच्या खमिरापासून सांभाळा.”वचन १३ मधूनइय्योब ५:१२
धूर्त लोकांच्या हाताला यश येऊ नये, म्हणून त्यांच्या योजना ते निष्फळ करतात,वचन १७ मधूनइय्योब ५:१३
ते शहाण्या लोकांस त्यांच्याच धूर्तपणात पकडतात, आणि कुटिलांच्या बेतांचा शेवट करतात.वचन १७ मधूनमत्तय २२:२२
त्यांच्या उत्तराने ते आश्चर्यचकित झाले आणि मग ते त्यांना सोडून निघून गेले.वचन १३ मधून1 थेस्सलनीकाकरांस २:४
उलट, आम्ही परमेश्वराला मान्य असलेले व जी शुभवार्ता आमच्यावर सोपवून दिली आहे ज्यापुढे बोलतो. आम्ही लोकांना खुश करण्याचा प्रयत्न करीत नाही, तर परमेश्वराला करतो जे हृदये पारखणारे आहेत.वचन १४ मधून2 करिंथकरांस २:२
कारण मी तुम्हाला दुःखी केले, तर मग ज्यांना मजकडून दुःख झाले आहे त्या तुमच्याशिवाय मला कोण आनंदित करेल?वचन १४ मधून
हे कोठे घडते



अभ्यास टीप
Settings