उत्पत्ती ३५:१८-२८
१८
तिने अखेरचा श्वास घेतला—कारण ती मृतवत झाली होती—तिने तिच्या मुलाचे नाव बेन-ओनी ठेवले पण त्याच्या वडिलांनी त्याचे नाव बिन्यामीन ठेवले.
१९
अशाप्रकारे राहेल मरण पावली आणि एफ्राथच्या (म्हणजे बेथलेहेमकडे) जाणार्या वाटेवर तिला मूठमाती देण्यात आली.
२०
मग याकोबाने तिच्या कबरेवर एक दगडी स्मारक उभारले, ते स्मारक आजही राहेलच्या कबरेचे खूण म्हणून तिथे उभे आहे.
२१
मग इस्राएल पुढे प्रवास करीत निघाला आणि त्याने एदेरच्या बुरुजापलीकडे आपला तळ दिला.
२२
तो त्या प्रदेशात राहत असताना रऊबेन हा आपल्या पित्याची उपपत्नी बिल्हा हिच्याजवळ जाऊन निजला, हे वृत्त इस्राएलला सांगण्यात आले.
२३
लेआचे पुत्र: याकोबाचा ज्येष्ठपुत्र रऊबेन, मग शिमओन, लेवी, यहूदाह, इस्साखार व जबुलून.
२४
राहेलचे पुत्र: योसेफ व बिन्यामीन हे होते.
२५
राहेलची दासी बिल्हा हिचे पुत्र: दान व नफताली हे होते.
२६
लेआची दासी जिल्पा हिचे पुत्र: गाद व आशेर हे होते.
२७
अशा रीतीने शेवटी याकोब किर्याथ-अर्बा म्हणजे हेब्रोन येथील मम्रे या ठिकाणी आपला पिता इसहाक याच्याकडे येऊन पोहोचला. याच ठिकाणी अब्राहामही राहिला होता.
२८
इसहाक एकशेऐंशी वर्षे जगला.
बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.
Settings