Skip to content
दानीएल ४:२०-३७

दानीएल ४:२०-३७

२०
तुम्ही पाहिलेले वृक्ष, जे वाढले आणि मजबूत झाले, ज्याचे शिखर आकाशाला स्पर्श करू लागले आणि जे सर्व पृथ्वीवरून पाहिले जाऊ शकते,
२१
ज्यामध्ये सुंदर पाने आणि विपुल फळे होती, ज्याने सर्वांना अन्न दिले, ज्याने वन्यपशूंना आश्रय दिला आणि ज्याच्या फांद्यांवर पक्षी घरटे बांधली;
२२
महाराज, तुम्ही तो वृक्ष आहात! आपण समर्थ व थोर झाला आहात. आपले थोरपण आकाशाला जाऊन भिडले आहे आणि आपली सत्ता पृथ्वीच्या टोकांपर्यंत गेली आहे.
२३
“हे महाराज, नंतर आपणाला येणारा एक पवित्र दूत दिसला आणि तो म्हणत होता, ‘वृक्ष तोडा, त्याचा नाश करा, पण त्याचा बुंधा व मुळे तशीच जमिनीतील गवतात राखा. त्याच्याभोवती हिरवळ असेल व तो लोखंडाच्या आणि कास्याच्या पट्टयाने बांधलेला असेल. आकाशातील दवाने तो भिजून जावो! सात वर्षे मैदानातल्या पशूंसारखी त्याची गत होवो!’
२४
“महाराज हे आहे याचा अर्थ, आणि महाराज, हा अर्थ आहे आणि परात्पर परमेश्वराने माझ्या स्वामी राजाच्या विरुद्ध काढलेला हा आदेश आहे:
२५
तुम्हाला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तुम्ही वन्यप्राण्यांबरोबर राहाल; तुम्ही बैलाप्रमाणे गवत खाल आणि आकाशाच्या दवाने भिजून जाल. सात कालखंड संपेपर्यंत तुम्ही या स्थितीत राहाल आणि मग तुमचा असा विश्वास असेल की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला ही राज्ये देतात.
२६
परंतु बुंधा व मुळे जमिनीतच ठेवण्याची आज्ञा देण्यात आली आहे, याचा अर्थ असा की, जेव्हा तुम्ही स्वीकाराल स्वर्ग राज्य करते तेव्हा तुमचे राज्य तुम्हाला परत केले जाईल.
२७
म्हणून महाराज, आनंदाने माझा सल्ला स्वीकारा: चांगले ते करून आपली पापे सोडा आणि वाईट सोडून पीडितांवर दया करा. मग तुमची समृद्धी होत राहील.”
२८
हे सगळे नबुखद्नेस्सर राजासोबत झाले.
२९
बारा महिन्यानंतर राजा बाबेलमधील राजवाड्याच्या गच्चीवर फिरत होता,
३०
मग राजा म्हणाला, “हे महान बाबेल नाही का, जे मी माझ्या प्रतापी सामर्थ्याने माझ्या वैभवाच्या गौरवासाठी शाही निवासस्थान म्हणून बांधले आहे?”
३१
तो हे शब्द उच्चारतो न उच्चारतो, तोच स्वर्गातून वाणी आली, “हे राजा नबुखद्नेस्सर, तुझ्यासाठी हे फर्मान घेण्यात आले आहे: तुझा राजेशाही अधिकार तुझ्यापासून काढून घेण्यात आला आहे.
३२
तुला लोकांमधून हाकलून देण्यात येईल आणि तू वन्यप्राण्यांसह राहशील; तू बैलाप्रमाणे गवत खाशील. सात कालखंड संपेपर्यंत तू असे स्वीकारशील की सार्वभौम परमेश्वर हे पृथ्वीवरील सर्व राज्यांवर सर्वोच्च परमेश्वर आहेत आणि ते ज्याला इच्छितात त्याला राज्ये देतात.”
३३
नबुखद्नेस्सरबद्दल जे बोलण्यात आले होते ते त्याच घटकेला पूर्ण झाले. त्याला लोकांमधून हाकलून देण्यात आले आणि तो बैलाप्रमाणे गवत खाऊ लागला. त्याचे शरीर दवाने भिजून ओलेचिंब झाले, त्याचे केस गरुडाच्या पिसांसारखे लांब वाढले आणि पक्ष्यांच्या नखांसारखी त्याची नखे वाढली.
३४
निर्धारित कालखंडाच्या शेवटी, मी, नबुखद्नेस्सरने माझी नजर वर स्वर्गाकडे वळवली आणि माझी बुद्धी मला पुन्हा लाभली. मग मी परात्पर परमेश्वराची महिमा केली; त्यांना आदर आणि गौरव दिला, जे सदासर्वकाळ जिवंत आहेत,
३५
पृथ्वीवरील सर्व लोक
३६
माझी बुद्धी मला परत लाभली. त्याचप्रमाणे माझा मान, वैभव आणि राज्य हेदेखील सर्व मला परत मिळाले. माझे मंत्री व अधिकारी माझ्याकडे परत आले, आणि मी माझ्या सिंहासनावर पुन्हा बसलो आणि मी पूर्वीपेक्षा अधिक महान झालो.
३७
आता मी, नबुखद्नेस्सर, स्वर्गाच्या राजाधिराजाची स्तुती, गौरव व सन्मान करतो, कारण ते जे काही करतात ते योग्य करतात आणि त्यांचे सर्व मार्ग न्याय्य आहेत. आणि जे गर्वाने चालतात त्यांना ते नम्र करण्यास समर्थ आहेत.

बायबल पाठ: Biblica® Open Marathi Contemporary Version™, © 1978, 1982, 2008, 2022, 2024 Biblica, Inc. · CC BY-SA 4.0“Biblica” is a trademark registered in the United States Patent and Trademark Office by Biblica, Inc., used with permission.