- English
- King James KJV
- Complete Jewish CJB
- World English WEBM
- Berean Standard BSB
- American Standard ASV
- Geneva GNV
- Young's Literal YLT
- Douay-Rheims DRC
- International
- Shqip ALB
- العربية SVD
- বাংলা BN-IRV
- မြန်မာ Judson
- 简体文 CUV-S
- 繁體中文 CUV-T
- Čeština BKR
- Nederlands STVE
- Français LSG
- Deutsch SCH
- Ελληνικά Vamvas
- ગુજરાતી GU-IRV
- Hausa HCB
- עברית Hebrew
- हिन्दी HCV
- Magyar KAROLI
- Bahasa Indonesia INDO-TB
- Italiano Diodati
- 日本語 Kougo
- 한국어 Korean
- മലയാളം MAL
- मराठी MRCV
- Norsk DNB
- فارسی OPV
- Polski BG
- Português Almeida
- Română Cornilescu
- Русский Synodal
- Español RVG
- Kiswahili Neno
- Svenska SV1917
- Tagalog TAG-ADB
- தமிழ் TCV
- తెలుగు TSA
- ภาษาไทย THAI-KJV
- Українська Ohienko
- Tiếng Việt CADMAN
- Yorùbá YCB
कुप्र व सर्गिय पौलुस येथील सेवा
प्रेषित १३:४-१३
कुप्र व सर्गिय पौलुस येथील सेवा
४
पवित्र आत्म्याने त्या दोघांना त्यांच्या मार्गावर पाठविले, ते खाली सलुकीयाला गेले आणि तारवात बसून सायप्रस बेटावर उतरले.
५
सलमीस या शहरात आल्यानंतर, ते यहूदी लोकांच्या सभागृहांमध्ये गेले व त्यांनी परमेश्वराचे वचन जाहीर केले. योहान त्यांच्याबरोबर मदतनीस म्हणून गेला होता.
६
त्या संपूर्ण बेटावर प्रवास करीत ते पाफोस येथे जाऊन पोहोचले. तिथे त्यांना यहूदी बार-येशू नावाचा जादूगार व खोटा संदेष्टे भेटला.
७
सेर्गियोस पौलुस नावाच्या राज्यपालाचा तो एक सेवक होता. सेर्गियोस पौलुस हा बुद्धिमान व ज्ञानी मनुष्य होता. या राज्यपालाने बर्णबा व शौलना बोलाविले, कारण परमेश्वराचे वचन ऐकण्याची त्याची इच्छा होती.
८
परंतु अलीम जादूगार (असा त्याच्या नावाचा अर्थ आहे) त्याने त्यांना विरोध केला आणि विश्वास ठेवण्यापासून राज्यपालाला दूर ठेवण्यासाठी प्रयत्न केला.
९
मग पवित्र आत्म्याने भरलेला शौल, ज्याला पौल देखील म्हणत असत, त्याने अलीमाकडे रोखून पाहात म्हटले,
१०
“तू सैतानाचा पुत्र आहेस आणि सर्व चांगुलपणाचा वैरी आहेस! तू सर्वप्रकारच्या कपटाने व चातुर्याने भरलेला आहेस. प्रभूच्या चांगल्या मार्गाला भ्रष्ट करण्याचे तू कधीच सोडणार नाहीस काय?
११
तर पाहा, आताच प्रभूचा हात तुझ्याविरुद्ध उठला आहे. तू आंधळा होशील आणि काही वेळ तुला सूर्याचा प्रकाश सुद्धा दिसणार नाही.” तत्काळ धुके व अंधकार यांनी तो ग्रासल्यासारखा झाला आणि आपल्याला हाती धरून न्यावे, म्हणून तो इकडे तिकडे कोणाचा तरी चाचपडत शोध करू लागला.
१२
राज्यपालाने जे घडले ते पाहिले, तेव्हा त्याने विश्वास ठेवला आणि प्रभूच्या शिक्षणाविषयी तो आश्चर्यचकित झाला.
१३
आता पौल आणि त्याचे सहकारी यांनी पाफोस शहर सोडले व ते तारवात बसून पंफुल्यातील पेर्गा येथे आले, या ठिकाणी योहानाने त्यांचा निरोप घेतला व तो यरुशलेमला परतला.
उताऱ्याचा अभ्यास
एका वचनावर नसून संपूर्ण उताऱ्यावर आधारित भाष्य.
- कोण
- कोठे
- केव्हा
- About
शास्त्रात हे आणखी कोठे सांगितले आहे.
मीखाह ३:८
परंतु माझ्याबाबतीत म्हणाल, तर याकोबाला त्याचे अपराध आणि इस्राएलला त्याचे पाप सांगण्यासाठी मी याहवेहच्या आत्म्याने, न्यायाने आणि सामर्थ्याने परिपूर्ण आहे.वचन ९ मधूनयोहान ८:४४
तुम्ही तुमचा पिता सैतानापासून आहात आणि तुमच्या पित्याची इच्छा पूर्ण करावयास पाहता. तो आरंभापासून घात करणारा व सत्याला धरून न राहणारा आहे, कारण त्याच्यामध्ये सत्य नाही. तो जेव्हा लबाड बोलतो तेव्हा तो त्याची जन्मभाषा बोलतो, कारण तो लबाड आहे व लबाडांचा पिता आहे.वचन १० मधूनमत्तय ७:१५
“खोट्या संदेष्ट्यांच्या विषयी अतिशय सावधगिरी बाळगा. ते मेंढरांची वस्त्रे धारण करून तुमच्याकडे येतात पण आतून क्रूर लांडगे असतात.वचन ६ मधूनहोशेय १४:९
कोण शहाणा आहे? त्यांना या गोष्टींची जाणीव होऊ द्या. कोण समंजस आहे? त्यांना समजू द्या. कारण याहवेहचे मार्ग योग्य आहेत; नीतिमान त्यावरून चालतील, पण पातकी त्यावर अडखळून पडतील.वचन ७ मधून2 करिंथकरांस ११:३
परंतु हव्वा जशी सापाकडून धूर्ततेने फसविली गेली, तसेच तुमची मने कशाने का होईना ख्रिस्तावरील तुमच्या शुद्ध व प्रामणिक भक्तीपासून भटकून जातील, अशी मला भीती वाटते.वचन १० मधूनगलातीकरांस १:७
जी खरोखर शुभवार्ता नाहीच. काही लोक उघडपणे तुम्हाला गोंधळात टाकीत आहेत आणि ख्रिस्ताच्या शुभवार्तेत बदल करण्याचा प्रयत्न करीत आहेत.वचन १० मधूनमत्तय १३:३८
जग हे शेत आहे आणि चांगले बी हे परमेश्वराच्या राज्याचे लोक आहेत. रानगवत सैतानाच्या लोकांचे प्रतीक आहे.वचन १० मधूनप्रेषित १३:१४
ते पेर्गापासून पुढे पिसिदिया प्रांतातील अंत्युखियास गेले. शब्बाथ दिवशी ते सभागृहात गेले आणि तिथे खाली जाऊन बसले.वचन ५ मधून2 तीमथ्य ३:८
यान्नेस आणि यांब्रेस यांनी जसा मोशेला विरोध केला, तसेच हे शिक्षक सत्याचा विरोध करतात. ते भ्रष्ट बुद्धीचे आणि विश्वासाविषयी नाकारलेले असे लोक आहेत.वचन ६ मधूनप्रेषित ४:८
नंतर पेत्र पवित्र आत्म्याने परिपूर्ण होऊन त्यांना म्हणाला: “अधिकारी आणि वडीलजनांनो!वचन ९ मधूनप्रेषित १५:३८
परंतु पौलाला त्याला बरोबर नेणे सुज्ञपणाचे वाटले नाही, कारण मार्क त्यांना पंफुल्यामध्ये सोडून गेला होता आणि या कार्यात पुढे जाण्यासाठी त्याने साथ दिली नव्हती.वचन १३ मधूनप्रेषित ४:३६
योसेफ लेवी असून सायप्रसवासी होता ज्याला प्रेषितांनी बर्णबा म्हणजे, “उत्तेजनाचा पुत्र” असे नाव दिले होते,वचन ४ मधून



अभ्यास टीप
Settings