Skip to content
1 इतिहास ४:२४-४३

1 इतिहास ४:२४-४३

२४
शिमओनाचे वंशज: नेमूएल, यामीन, यारीब, जेरह व शौल;
२५
शौलाचा पुत्र शल्लूम, शल्लूमाचा पुत्र मिबसाम आणि मिबसामचा पुत्र मिश्मा.
२६
मिश्माचा वंशज: त्याचा पुत्र हम्मूएल. हम्मूएलाचा पुत्र जक्कूरचा पुत्र शिमी.
२७
शिमीस सोळा पुत्र व सहा कन्या झाल्या; पण त्याच्या भावास फारशी संतती झाली नाही आणि त्यांचा वंश यहूदाहच्या वंशाप्रमाणे वृद्धी पावला नाही.
२८
त्यांनी वस्ती केलेली गावे ही: बेअर-शेबा, मोलादाह, हसर-शुआल,
२९
बिल्हा असेम, तोलाद,
३०
बेथुएल, होरमाह सिकलाग,
३१
बेथ-मर्काबोथ, हसर-सुसीम, बेथ-बिरी व शाराईम. दावीदाच्या कारकिर्दीपर्यंत ही त्यांची शहरे होती.
३२
त्यांचे वंशज एटाम, एईन, रिम्मोन, तोखेन आणि आशान या पाच नगरात आणि
३३
या नगरांच्या सभोवतीच्या गावात बआलपर्यंत वस्ती करून होते.
३४
मेशोबाब, यामलेख, अमस्याहाचा पुत्र योशाह,
३५
योएल. येहू योशिब्याहचा पुत्र, जो सेरायाहचा पुत्र, जो असिएलाचा पुत्र होता.
३६
एलिओएनाइ, याकोबाह, येशोहाइयाह, असायाह, अदिएल, यशीमिएल, बेनाइयाह.
३७
जीजा हा शिफीचा पुत्र, जो अल्लोनचा पुत्र, जो यदायाहचा पुत्र, जो शिम्रीचा पुत्र व जो शमायाहचा पुत्र होता.
३८
नावाने वर सूचीबद्ध केलेले हे सर्व पुरुष कुलप्रमुख होते. या कुटुंबांचा खूप विस्तार झाला.
३९
ते आपल्या मेंढरांच्या कळपांसाठी कुरणाच्या शोधार्थ पूर्वेकडे गदोरच्या खोर्‍यापर्यंत गेले.
४०
तिथे त्यांना कसदार व उत्तम चारा सापडला. तो देश विस्तीर्ण असून शांत व निवांत होता; तिथे पूर्वी हामाचे वंशज राहत असत.
४१
ज्यांच्या नावाची वर नोंद केली आहे, त्यांनी यहूदीयाचा राजा हिज्कीयाहच्या कारकिर्दीत तिथे आक्रमण करून हामच्या वंशजांना आणि तसेच मऊनीमींना त्यांच्या डेर्‍यांसह नष्ट करून ते त्यांच्या ठिकाणी आजपर्यंत वसलेले आहेत; कारण त्या ठिकाणी त्यांच्या शेरडामेंढरांसाठी चारा होता.
४२
त्यापैकी म्हणजे शिमओनाच्या गोत्रातील पाचशे पुरुषांनी इशीचे पुत्र पेलतियाह, निरय्याह, रफायाह व उज्जीएल यांनी त्यांचे नेतृत्व केले आणि ते सेईर डोंगरावर गेले.
४३
तिथे जे पळून गेलेले अमालेकी उरले होते, त्यांचा संहार करून ते आजवर तिथे राहतात.
Settings

Reading style

Typeface

Font size 19px

Reading width 75 chars

Options