Skip to content
1 इतिहास ५:१-१०

रऊबेनाची वंशावळ व जन्मसिद्ध हक्काची हानी

1 इतिहास ५:१-१०
रऊबेन हा ज्येष्ठपुत्र होता खरा, पण त्याने आपल्या पित्याचा पलंग भ्रष्ट केला म्हणून त्याचा ज्येष्ठत्वाचा हक्क इस्राएलपुत्र योसेफच्या संततीस देण्यात आला, म्हणून वंशावळीत रऊबेनचे नाव ज्येष्ठत्वाच्या हक्काप्रमाणे नमूद करण्यात आले नाही.
जरी यहूदाह त्याच्या बंधूतील सर्वात शक्तिमान होता आणि यहूदाहच्या वंशातूनच एक राज्यकर्ता उदयास आला, तरी योसेफाला ज्येष्ठत्वाचा हक्क मिळाला.
इस्राएलचा ज्येष्ठपुत्र रऊबेनचे पुत्र: हनोख, पल्लू, हेस्रोन व कर्मी.
योएलाचे वंशज: त्याचा पुत्र शमायाह, त्याचा पुत्र गोग, त्याचा पुत्र शिमी,
शिमीचा पुत्र मीखाह, त्याचा पुत्र रेआयाह, त्याचा पुत्र बाल,
बालाचा पुत्र बैरा रऊबेन वंशाचा सरदार असून त्याला अश्शूरचा राजा तिग्लथ-पिलेसर ने कैद करून नेले.
त्याच्या भावांची वंशावळी त्यांच्या कुळांप्रमाणे लिहिली ती अशी: प्रमुख ईयेल, जखर्‍याह,
बेलाचा पिता आजाजचा पिता शमा व त्याचा पिता योएल. हा वंश नबो व बआल-मेओन येथपर्यंत अरोएरात वस्ती करून राहिला.
पूर्वेकडे फरात नदीजवळील रानाच्या सीमेपर्यंत त्यांनी वस्ती केली, कारण गिलआद देशात त्यांचे पशुधन भरपूर वाढले होते.
१०
शौलाच्या कारकिर्दीत त्यांनी हगरी लोकांशी युद्ध करून त्यांचा संहार केला; व गिलआदाच्या पूर्वेकडे असलेल्या सगळ्या हगरी प्रदेशातील त्या लोकांच्या डेर्‍यात ते वस्ती करू लागले.
Settings

Reading Style

Typeface

Font Size 19px

Reading Width 45 chars

Options