Skip to content

Year बद्दल बायबलमधील वचने

11 वचने · 6 पैलू

प्रमुख बायबल वचने

  1. त्यानंतर परमेश्वराने म्हटले: “दिवस आणि रात्र वेगळी करण्यासाठी आकाशात ज्योती होवोत व त्या ॠतू, दिवस आणि वर्षे दाखविणारी चिन्हे होवोत.

  2. आपोआप उगविलेल्या पिकांची कापणी करू नये किंवा छाटणी न झालेल्या द्राक्षवेलीची द्राक्षे गोळा करू नये. कारण जमिनीला हे विश्रांतीचे वर्ष राहील.

  3. “ ‘एखाद्याने तटबंदीच्या शहरातील आपले घर विकले असेल, तर त्याला एक वर्षाच्या काळात खंडणी भरून ते परत सोडवून घेता येईल. ते सोडविण्याचा हक्क त्याला पूर्ण एक वर्ष राहील.

  4. नगर तटबंदीच्या आत असलेले घर जर त्याने ते एक वर्षाच्या आत खंडणी भरून सोडवून घेतले नाही, तर ते नव्या मालकाच्या कायमचेच मालकीचे होईल. योबेल वर्षीही ते त्याच्या मूळ मालकाला परत करावे लागणार नाही.

  5. हा दुष्ट विचार मनात न आणण्याची खबरदारी घ्या: “कर्जमाफी करण्याचे सातवे वर्ष जवळ आले आहे.” म्हणून तुम्ही एखाद्या इस्राएली बांधवाबद्दल वाईट इच्छा दाखवू नका आणि मदत नाकारू नका. जर तो याहवेहकडे आपले गार्‍हाणे घेऊन गेला, तर ते तुमच्याविरुद्ध पाप असे मोजण्यात येईल.

  6. हजार वर्षे ही तुम्हाला असे आहेत, जसा कालचा गेलेला एक दिवस, किंवा रात्रीचा एक प्रहर.

  7. प्रिय मित्रांनो, एक गोष्ट तुम्ही विसरू नका: प्रभूसाठी एक दिवस हजार वर्षांसारखा आहे आणि हजार वर्षे एका दिवसासारखी आहेत.

  8. त्याने त्या अजगराला, त्या पुरातन सापाला, जो पिशाच्च किंवा सैतान आहे त्याला धरले आणि एक हजार वर्षांसाठी साखळदंडाने जखडून टाकले,

  9. आणि अथांग कूपात टाकले. हा हजार वर्षांचा काळ पूर्ण होईपर्यंत अजगराने इतःपर कोणत्याही राष्ट्राला फसवू नये म्हणून त्याने अथांग कूप बंद केले आणि त्याला कुलूप लावून शिक्कामोर्तब केले. त्यानंतर त्याला थोड्या काळासाठी मोकळे सोडण्यात येईल.

  10. नंतर ज्यांना न्याय करण्याचे अधिकार देण्यात आले होते त्यांना मी राजासनावर बसलेले पाहिले. आणि येशूंच्या साक्षीमुळे व परमेश्वराच्या वचनामुळे ज्यांचा शिरच्छेद करण्यात आला त्यांचे आत्मे पहिले आणि त्यांनी त्या पशूला किंवा त्याच्या मूर्तीला नमन केले नव्हते किंवा आपल्या कपाळावर व हातावर त्याची खूणही घेतली नव्हती. ते पुन्हा जिवंत झाले होते व त्यांनी ख्रिस्तासह एक हजार वर्षे राज्य केले.

  11. हा हजार वर्षांचा काळ संपल्यावर सैतानाला तुरुंगातून सोडण्यात येईल,