Vanity बद्दल बायबलमधील वचने: Idolatry is
Idolatry is बद्दल वचने
त्यांनी याहवेहचे विधी आणि त्यांच्या पूर्वजांबरोबर केलेला करार व त्यांचे नियम पाळण्याचा इशारा दिला होता तो त्यांनी नाकारला. ते निरर्थक मूर्तींच्या मागे लागले आणि स्वतःही निरर्थक झाले. जरी परमेश्वराने त्यांना आदेश दिला होता, “ते जसे करतात तसे करू नका,” तरी त्यांनी त्यांच्या सभोवतालच्या राष्ट्रांचे अनुकरण केले.
मी व्यर्थ मूर्तिपूजकांचा तिरस्कार करतो; परंतु माझा भरवसा याहवेहवर आहे.
कोरीव मूर्ती घडविणारे किती शून्यवत आहेत, आणि त्यांना जे मौल्यवान वाटते ते मातीमोल आहे. जे त्यांच्यावतीने बोलतात, ते अंध आहेत; ते अज्ञानी असून ते लज्जित झाले आहेत.
जिच्यापासून काहीही लाभ होत नाही अशा दैवतांना आकार कोण देतो व त्या मूर्ती कोण घडवितो?
लाकडाच्या व्यर्थ मूर्तींद्वारे ज्यांना शिक्षण मिळते, ते सर्व निर्बुद्ध व मूर्ख आहेत;
तरीसुद्धा माझे लोक मला विसरले; ते व्यर्थ मूर्तीला व्यर्थ धूप जाळतात, ते त्यांना अडखळत चालावयास लावतात ते पूर्वजांचे मार्ग आहेत. जे मार्ग नीट बांधलेले नाही, म्हणून त्या आडमार्गावरून त्यांना चलविले गेले.