मुख्य मजकुरावर जा

Urim and Thummin बद्दल बायबलमधील वचने: Instances of consulting God by

8 वचने · 6 पैलू

Instances of consulting God by बद्दल वचने

  1. यहोशुआच्या मृत्यूनंतर इस्राएली लोकांनी याहवेहला विचारले, “कनानी लोकांविरुद्ध युद्ध करण्यासाठी आमच्यापैकी प्रथम कोणी जावे?”

  2. इस्राएली लोक वर बेथेल येथे गेले आणि परमेश्वराशी मसलत केली. ते म्हणाले, “बिन्यामीन लोकांशी लढण्यासाठी आमच्यातील कोण प्रथम वर जाईल?” याहवेहने उत्तर दिले, “यहूदाहने प्रथम जावे.”

  3. एलअज़ाराचा पुत्र व अहरोनाचा नातू फिनहास हा तिथे कोशापुढे सेवा करीत होता.) त्यांनी विचारले, “आम्ही पुन्हा जाऊन आमचा इस्राएली भाऊबंद बिन्यामीन याविरुद्ध लढावे किंवा नाही?” याहवेहने उत्तर दिले, “जा, कारण उद्या मी त्यांना तुमच्या हातात देणार आहे.”

  4. जेव्हा दावीदाला समजले की, शौल त्याच्याविरुद्ध कट करीत आहे, तेव्हा तो अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद इकडे आणा.”

  5. दावीद म्हणाला, “याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, शौल माझ्यामुळे या कईलाह नगराचा नाश करण्यास पाहत आहे, असे तुमच्या दासाने नक्की ऐकले आहे.

  6. कईलाहचे लोक मला त्याच्या स्वाधीन करतील काय? तुमच्या सेवकाने ऐकल्याप्रमाणे शौल इकडे येईल काय? याहवेह, इस्राएलच्या परमेश्वरा, मी विनंती करतो, तुमच्या सेवकाला हे सांगा.” आणि याहवेहने उत्तर दिले, “तो येईल.”

  7. तेव्हा दावीद अहीमेलेखचा पुत्र अबीयाथार याजकाला म्हणाला, “एफोद माझ्याकडे आणा.” तेव्हा अबीयाथारने ते त्याच्याकडे आणले,

  8. आणि दावीदाने याहवेहला विचारले, “छापा टाकलेल्या या लोकांचा मी पाठलाग करू काय? ते माझ्या हाती लागतील काय?” याहवेहने उत्तर दिले, “त्यांचा पाठलाग कर, ते खात्रीने तुझ्या हाती लागतील आणि त्यांची सुटका करण्यात यश पावशील.”