मुख्य मजकुरावर जा

Treasure-Houses बद्दल बायबलमधील वचने: Chambers provided in the temple for various kinds of offerings

6 वचने · 9 पैलू

Chambers provided in the temple for various kinds of offerings बद्दल वचने

  1. लेवी दशांश गोळा करीत असताना, त्यांच्याबरोबर अहरोनाच्या वंशातील एक याजक असावा व लेव्यांनी दशांशाचा दशांश परमेश्वराच्या भवनामध्ये समर्पित करून मंदिराच्या कोठारात जमा करावा.

  2. इस्राएली लोकांनी व लेवी यांनी धान्य, नवा द्राक्षारस, जैतुनाचे तेल, यांची अर्पणे कोठारात आणून ती सेवा करणारे याजक, द्वारपाल आणि संगीतकार यांच्या वापरासाठी असलेल्या पवित्र पात्रांमध्ये ठेवावीत. “अशा रीतीने आम्ही परमेश्वराच्या भवनाकडे दुर्लक्ष करणार नाही.”

  3. त्याने तोबीयाहाला एका कोठडी दिली. ही कोठडी पूर्वी धान्यार्पण, ऊद, मंदिराचे सामान, तसेच धान्य, नवीन द्राक्षारस आणि जैतुनाचे तेल यांच्या दशांशांचे साठे ठेवण्यासाठी वापरली जात असे. ही सर्व अर्पणे लेव्यांसाठी, संगीतकारांच्या सभासदांसाठी आणि द्वारपालांसाठी, त्याचबरोबर याजकांसाठी वर्गणी म्हणून असत.

  4. नंतर ती कोठडी संपूर्णपणे शुद्ध करून घ्यावी असा मी आदेश दिला. मग मी परमेश्वराच्या भवनातील सामान, धान्यार्पणे व ऊद ही परत त्या कोठडीत आणली.

  5. आणि पुन्हा एकदा यहूदीयाचे सर्व लोक धान्य, नवा द्राक्षारस व तेलाचे दशांश मंदिराच्या कोठारांत आणू लागले.

  6. तुमचा सर्व दशांश मंदिराच्या भांडारात आणा म्हणजे माझ्या भवनात पुरेसे अन्न राहील. याबाबत तुम्ही माझी परीक्षा घ्या,” सर्वसमर्थ याहवेह म्हणतात. “आणि बघा तुमच्यासाठी मी स्वर्गाची धरणद्वारे उघडेन आणि तुमच्यावर आशीर्वादाचा एवढा वर्षाव करेन की ते साठविण्यास तुमच्याजवळ पुरेशी जागाही असणार नाही.