मुख्य मजकुरावर जा

Treason बद्दल बायबलमधील वचने: Jesus falsely accused of

10 वचने · 5 पैलू

Jesus falsely accused of बद्दल वचने

  1. येशू राज्यपालाच्या पुढे उभे होते आणि राज्यपालाने त्यांना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हटले तसे.”

  2. मग त्यांनी काट्यांचा एक मुकुट गुंफला आणि त्यांच्या मस्तकांवर घातला. राजदंड म्हणून त्यांनी त्यांच्या उजव्या हातात एक काठी दिली आणि त्यांनी गुडघे टेकले आणि त्यांचा उपहास करीत ते त्यांना म्हणाले, “हे यहूद्यांच्या राजा, तुझा जयजयकार असो!”

  3. ते त्यांच्या तोंडावर थुंकले, त्यांच्या हातात दिलेली काठी त्यांनी हिसकावून घेतली आणि त्यांच्या मस्तकावर वारंवार मारले.

  4. त्यांनी त्यांच्यावर दोषारोप केला व ते म्हणू लागले, “आम्हाला आढळून आले की हा मनुष्य आमच्या राष्ट्राचा घातपात करू पाहत आहे. कैसराला कर देण्यास विरोध करतो आणि असा दावा करतो की मी ख्रिस्त, राजा आहे.”

  5. तेव्हा पिलाताने येशूंना विचारले, “तू यहूद्यांचा राजा आहेस काय?” येशूंनी उत्तर दिले, “तुम्ही म्हणता ते बरोबर आहे.”

  6. त्यांच्या डोक्याच्या वर एक लेखपत्रक लावण्यात आले. त्यावर लिहिले होते: हा यहूद्यांचा राजा आहे.

  7. तेव्हापासून, पिलात येशूंना मुक्त करण्याचा प्रयत्न करू लागला, परंतु यहूदी पुढारी ओरडत राहिले, “तुम्ही या मनुष्याला सोडले, तर तुम्ही कैसराचे मित्र नाही; कारण जो कोणी स्वतःला राजा म्हणवितो तो कैसराचा विरोधी आहे.”

  8. तो वल्हांडणाच्या तयारीचा दिवस असून; ती दुपारची वेळ होती. “हा पाहा तुमचा राजा,” पिलात यहूदीयांना म्हणाला.

  9. पण लोकांनी अधिकच मोठ्याने गर्जना केली, “त्याला येथून न्या! त्याला येथून न्या! त्याला क्रूसावर खिळा!” तेव्हा पिलाताने विचारले, “तुमच्या राजाला मी क्रूसावर खिळावे काय?” त्यावर मुख्य याजक म्हणाले, “कैसराशिवाय आम्हाला दुसरा राजा नाही.”

  10. पिलाताने त्यांच्या क्रूसावर एक लेखपत्रक लावले, ते असे होते: यहूद्यांचा राजा, नासरेथकर येशू.