Skip to content

Tithe बद्दल बायबलमधील वचने

46 वचने · 20 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. ज्या सर्वसमर्थ परमेश्वराने तुझे शत्रू तुझ्या हाती दिले ते परमेश्वर धन्यवादित असो.” मग अब्रामाने मलकीसदेकाला सर्वांचा दहावा भाग दिला.

  2. आणि हा जो धोंडा मी स्तंभ म्हणून उभा केला आहे ते परमेश्वराचे भवन होईल आणि जे सर्वकाही ते मला देतील, त्यातील प्रत्येकाचा दशांश मी त्यांना अर्पण करेन.”

  3. “ ‘भूमीचा दशांश, मग ते शेतातील उत्पादन असो किंवा झाडांची फळे, याहवेहचे आहेत; ते याहवेहसाठी पवित्र आहेत.

  4. ज्या कोणाला त्यांचा कोणताही दशांश भाग सोडावयाचा असेल त्यांनी त्या वस्तूंच्या किमतीचा पाचवा भाग अधिक रक्कम भरावी.

  5. गुरे आणि शेरडेमेंढरांचा प्रत्येक दशांश—मेंढपाळाच्या काठीखालून जाणारा प्रत्येक दहावा प्राणी—याहवेहसाठी पवित्र असेल.

  6. कोणीही वाईटामधून चांगल्याची निवड करू नये किंवा अदलाबदल करू नये; तशी अदलाबदल केल्यास दोन्हीही प्राणी आणि बदली केलेला पवित्र होतील आणि त्यांना खंडणी भरून सोडवू शकणार नाहीत.’ ”

  7. याहवेहने अहरोनाला म्हटले, “त्यांच्या देशात तुला वतन असणार नाही किंवा तुला त्यांच्यात कोणताही वाटा असणार नाही; इस्राएलमध्ये मी तुझा वाटा व तुझे वतन आहे.”

  8. लेवी वंश सभामंडपाची सेवा करताना जी कामे करतात त्याचा मोबदला म्हणून इस्राएलातून येणारा सर्व दशांश मी त्यांना त्यांचे वतन असे देत आहे.

  9. लेवी लोक सभामंडपामध्ये सेवा करतील आणि त्याविरोधात केलेल्या अपराधाची जबाबदारी ते स्वतः वाहतील. येणार्‍या पिढ्यांपर्यंत हा सर्वकाळचा नियम असेल. इस्राएलमध्ये त्यांना वतन मिळणार नाही.

  10. त्याऐवजी इस्राएली लोक जो दशांश अर्पण म्हणून याहवेहला सादर करतात तो मी लेवींना वतन म्हणून देत आहे. म्हणूनच त्यांच्याबद्दल मी म्हटले: “त्यांना इस्राएलमध्ये वतन नसणार.”

  11. “लेवी लोकांशी बोल व त्यांना सांग: ‘इस्राएलातून जो दशांश मी तुम्हाला तुमचे वतन म्हणून देतो, जेव्हा तो तुम्हाला मिळतो, त्या दशमांशातील दहावा हिस्सा याहवेहचे अर्पण म्हणून सादर करावा.

  12. तुमचे अर्पण खळ्यातील धान्य किंवा द्राक्षकुंडातील रसाप्रमाणे तुमच्यासाठी गणले जाईल.

  13. याप्रकारे इस्राएलातून जो दशांश तुम्हाला मिळतो त्यातून तुम्ही सुद्धा आपले अर्पण याहवेहला सादर करावे. या दशमांशातील जो याहवेहचा वाटा तो तुम्ही अहरोन याजकाला द्यावा.

  14. तिथेच तुम्ही आपली होमार्पणे, यज्ञार्पणे, तुमचे दशांश व विशेष भेटी, नवस फेडण्यासाठी आणलेली अर्पणे आणि तुमची स्वेच्छार्पणे आणि तुमच्या गुरांची व शेरडामेंढरांची प्रथम वत्सांची अर्पणे आणावीत.

  15. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वराच्या सान्निध्यात तुम्ही आणि तुमच्या कुटुंबाने भोजन करावे आणि तुम्ही हातात घेतलेल्या प्रत्येक गोष्टीत आनंद कराल, कारण याहवेह तुमच्या परमेश्वराने तुम्हाला आशीर्वादित केले आहे.

  16. धान्य, द्राक्षारस व तेलाचे दशांश, गुरांचे प्रथमवत्स, नवसफेडीच्या वस्तू, स्वेच्छार्पणे व इतर अर्पणे या परमेश्वराला वाहिलेल्या अर्पणातून काहीही आपल्या नगरात खाऊ नये.

  17. पण ही सर्व अर्पणे याहवेह तुमचे परमेश्वर निवडील त्या ठिकाणी तुमचे पुत्र, कन्या, तुमचे दास व दासी व तुमच्या शहरात राहणारे लेवी, या सर्वांसह तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर खावीत. तुम्ही जे करता त्या प्रत्येक सेवेबद्दल परमेश्वरापुढे आनंद करावा.

  18. जेव्हापर्यंत तुमचे या भूमीवर वास्तव्य असेल तेव्हापर्यंत लेवी वंशजांकडे दुर्लक्ष न करण्याची काळजी घ्यावी.

  19. तुमच्या शेतात प्रत्येक वर्षी होणार्‍या उत्पन्नाचा दशांश भाग वेगळा ठेवण्याची खात्री करा.

  20. धान्याचा, नवीन द्राक्षारसाचा व जैतुनाच्या तेलाचा दशांश आणि तुमच्या गुरांच्या व शेरडामेंढरांच्या प्रथम वत्सांनाही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर त्यांच्या नावाप्रित्यर्थ खाण्यासाठी, ते जे पवित्रस्थान निवडतील त्या ठिकाणी खा, म्हणजे तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराचे नेहमीच आदर करण्याचे शिकाल.

  21. परंतु जर ते ठिकाण खूप दूर असेल आणि तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वराद्वारे आशीर्वादित झाला असाल आणि तुमचा दशांश घेऊन जाणे गैरसोईचे असेल (कारण जे ठिकाण याहवेह त्यांच्या नावाच्या स्थापनेसाठी निवडतील ते खूप दूर आहे),

  22. तर मग तुमचे दशांश चांदीच्या मोबदल्यात घ्या, ही चांदी तुमच्याबरोबर घ्या आणि याहवेह तुमचे परमेश्वर निवडतील त्या ठिकाणी जा.

  23. त्या चांदीने तुम्हाला आवडेल ते विकत घ्या: गाई, बैल, मेंढी, थोडा द्राक्षारस अथवा आंबलेले पेय आणि तुम्हाला हवे असलेले काहीही. त्या ठिकाणी याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर तुम्ही आणि तुमच्या कुटुंबासह खाऊन पिऊन आनंद करावा.

  24. आणि तुमच्या नगरात राहत असलेल्या लेवी वंशजांकडे तुम्ही कधीही दुर्लक्ष करू नये; कारण त्यांना तुमच्यासारखा वाटा अथवा वतन नाही.

  25. प्रत्येक तिसर्‍या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा,