मुख्य मजकुरावर जा

Tithe बद्दल बायबलमधील वचने: To be consumed at home every third year to promote hospitality and charity

6 वचने · 20 पैलू

To be consumed at home every third year to promote hospitality and charity बद्दल वचने

  1. प्रत्येक तिसर्‍या वर्षाच्या शेवटी संपूर्ण उत्पन्नाचा दशांश आणावा आणि तुमच्या नगरात एकत्र साठवून ठेवावा,

  2. म्हणजे लेवी वंशजांना (ज्यांना स्वतःचा वाटा अथवा वतन नाही) तो दशांश द्यावा किंवा परकियांना द्यावा अथवा तुमच्या नगरात असणार्‍या विधवांना आणि अनाथांना द्यावा. म्हणजे ते खाऊन तृप्त होतील आणि मग याहवेह तुमचे परमेश्वर तुम्हाला आणि तुमच्या हाताच्या कार्याला आशीर्वादित करतील.

  3. तुम्ही तुमच्या सर्व उत्पन्नाचा दशांश तिसर्‍या वर्षी, म्हणजे दशांशाच्या वर्षी लेवी वंशजांना, परदेशी लोकांना, अनाथांना आणि विधवांना द्यावा, म्हणजे तुमच्या नगरात ते खाऊन तृप्त होतील.

  4. मग तुम्ही याहवेह तुमच्या परमेश्वरासमोर सांगावे, “मी माझ्या घरातून पवित्र हिस्सा काढला आहे. लेवी वंशजांना, परदेशीयांना, अनाथांना आणि विधवांना तुमच्या आज्ञेप्रमाणे दिला आहे. मी कोणतीही आज्ञा मोडली नाही किंवा तुमचा कोणताही नियम विसरलो नाही.

  5. मी विलाप करीत असताना त्या पवित्र वाट्यातील काहीही खाल्ले नाही, धार्मिक संस्कारांच्या दृष्टीने अशुद्ध असताना ते घराच्या बाहेर नेले नाही किंवा एखाद्या मृत व्यक्तीला अर्पण केले नाही. हे माझ्या याहवेह परमेश्वरा, मी तुमचे आज्ञापालन केले आहे. तुम्ही सांगितलेले सर्वकाही मी केले आहे.

  6. म्हणून हे परमेश्वरा, स्वर्गातील तुमच्या पवित्र निवासस्थानातून तुम्ही खाली पाहा आणि आमच्या पूर्वजांना वचन दिल्याप्रमाणे जो दुधामधाचे प्रवाह वाहणारा असा देश तुम्ही आम्हाला दिला आहे त्याला व आम्हा इस्राएली लोकांना आशीर्वादित करा.”