मुख्य मजकुरावर जा

The, or Immediate Government By God Theocracy बद्दल बायबलमधील वचने: Proclaiming war

8 वचने · 15 पैलू

"The, or Immediate Government By God Theocracy" साठी शोधा

Proclaiming war बद्दल वचने

  1. मग याहवेह मोशेला म्हणाले, “या घटनेची आठवण रहावी म्हणून तू ती ग्रंथात लिहून ठेव आणि ते यहोशुआच्या कानी पडेल याची खात्री कर, कारण मी पृथ्वीवरून अमालेकांचा संपूर्णपणे नाश करणार.”

  2. मोशेने त्या ठिकाणी एक वेदी बांधली व त्या ठिकाणाचे नाव याहवेह निस्सी असे ठेवले.

  3. तो म्हणाला, “कारण याहवेहच्या राजासनाविरुद्ध हात उगारले गेले, म्हणून याहवेह पिढ्यान् पिढ्या पर्यंत अमालेक्यांशी युद्ध करतील.”

  4. मग याहवेह मोशेला म्हणाले,

  5. “इस्राएली लोकांसाठी मिद्यानी लोकांचा सूड घे. त्यानंतर तू तुझ्या लोकांत मिळविला जाशील.”

  6. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “पाहा, मी यरीहो शहर, त्याचबरोबर त्यांचा राजा आणि त्यांचे योद्धे पुरुष देखील तुझ्या हाती दिले आहे.

  7. सर्व सशस्त्र माणसांना घेऊन शहराभोवती एक प्रदक्षिणा घाला. सहा दिवस असेच करा.

  8. तेव्हा याहवेह यहोशुआला म्हणाले, “भिऊ नकोस किंवा निराश होऊ नकोस; सर्व सैन्य बरोबर घे आणि आय शहरावर हल्ला कर, कारण जिंकून घेण्यासाठी मी आय शहराचा राजा, त्याचे लोक, त्याचे नगर व त्याची भूमी तुझ्या हाती दिली आहे.