मुख्य मजकुरावर जा

The, or Immediate Government By God Theocracy बद्दल बायबलमधील वचने: Directing the movements of the nation

9 वचने · 15 पैलू

"The, or Immediate Government By God Theocracy" साठी शोधा

Directing the movements of the nation बद्दल वचने

  1. इस्राएली लोकांच्या सर्व प्रवासात, जेव्हा निवासमंडपावरून मेघ वर जाई तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत;

  2. पण मेघ वर गेला नाही, तर तो वर जाईल त्या दिवसापर्यंत ते पुढे जात नसत.

  3. जेव्हा मंडपावरून मेघ वर जाई, तेव्हा ते पुढची वाटचाल करीत असत; आणि जेव्हा मेघ थांबत असे, तिथे इस्राएली लोक तळ देत असत.

  4. याहवेहच्या आज्ञेनुसार इस्राएली लोक प्रवासास निघत असत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत. जोपर्यंत निवासमंडपावर मेघ थांबत असे तोपर्यंत ते तळ देऊन राहत असत.

  5. जेव्हा मेघ दीर्घकाळ निवासमंडपावर थांबून राहिला, तेव्हा इस्राएली लोक याहवेहची आज्ञा पाळीत व पुढे जात नसत.

  6. कधीकधी मेघ काहीच दिवस निवासमंडपावर थांबत असे, तेव्हा याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देऊन राहत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात.

  7. कधीकधी मेघ केवळ संध्याकाळपासून सकाळपर्यंत राहत असे आणि सकाळी जेव्हा तो वरती घेतला जाई, लोक पुढे जात. तो दिवस असो किंवा रात्र, जेव्हा मेघ वरती घेतला जात असे, ते पुढे निघत असत.

  8. निवासमंडपावर मेघ दोन दिवस थांबून राहो किंवा एक महिना किंवा एक वर्ष राहो, इस्राएली लोक आपल्या छावणीत राहत आणि पुढे जात नसत; परंतु जेव्हा मेघ वर घेतला जाई, ते पुढे जात.

  9. याहवेहच्या आज्ञेनुसार ते तळ देत आणि याहवेहच्या आज्ञेनुसार ते पुढे जात. मोशेद्वारे याहवेहने दिलेल्या आज्ञेचे त्यांनी पालन केले.