The, or Immediate Government By God Theocracy बद्दल बायबलमधील वचने: Appointing ecclesiastical officers
Appointing ecclesiastical officers बद्दल वचने
“तुझा भाऊ अहरोन व त्याचे पुत्र, नादाब, अबीहू, एलअज़ार व इथामार यांनी याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्यांना इस्राएली लोकांमधून तुझ्याकडे आणावे.
“अहरोन व त्याचे पुत्र यांना सभामंडपाच्या प्रवेशद्वाराशी आणावे व त्यांना पाण्याने धुवावे.
मग अहरोनाला पवित्र वस्त्रे घालावीत. त्याने याजक म्हणून माझी सेवा करावी, यासाठी त्याला अभिषेक करून पवित्र करावे.
त्याच्या पुत्रांना आणून त्यांना झगे घालावे.
जसा त्यांच्या पित्याला अभिषेक केला, तसाच त्यांनाही अभिषेक करावा, म्हणजे याजक म्हणून ते माझी सेवा करतील. त्यांचा हा याजकपणाचा अभिषेक पिढ्यान् पिढ्या चालू राहील.”