मुख्य मजकुरावर जा

The Lot बद्दल बायबलमधील वचने: Priests and Levites designated by, for sanctuary service

27 वचने · 9 पैलू

Priests and Levites designated by, for sanctuary service बद्दल वचने

  1. कोणताही भेदभाव न करता चिठ्ठ्या टाकून विभागण्यात आले, कारण ते एलअज़ार व इथामार या दोन्ही वंशातून घेतलेले मंदिराचे अधिकारी व परमेश्वराचे निवडलेले अधिकारी होते.

  2. लेवी वंशातील नथानेलाचा पुत्र लेखनिक शमायाहने राजाच्या व शासक—याजक सादोक, अबीयाथारचा पुत्र अहीमेलेख व याजक आणि लेवीच्या कुटुंबप्रमुखांसमोर—नावनोंदणी केली. एलअज़ारच्या वंशातील एक कुटुंब व इथामारच्या वंशातील एक कुटुंब घेण्यात आले.

  3. प्रथम चिठ्ठी यहोयारीबच्या नावे आली, दुसरी यदायाह,

  4. तिसरी हारीम, चवथी सोरीम,

  5. पाचवी मल्कीयाह, सहावी मियामीन,

  6. सातवी हक्कोस, आठवी अबीयाह,

  7. नववी येशूआ, दहावी शखन्याह,

  8. अकरावी एल्याशीब, बारावी याकीम,

  9. तेरावी हुप्पाह, चौदावी येशेबियाब,

  10. पंधरावी बिल्गाह, सोळावी इम्मेरा,

  11. सतरावी हेजीरा, अठरावी हप्पिसेसा,

  12. एकोणविसावी पथह्याह, विसावी यहेज्केल,

  13. एकविसावी याखीन, बाविसावी गामूल,

  14. तेविसावी दलायाह, चोविसावी माझियाह.

  15. त्या सर्वांचा पूर्वज अहरोनला याहवेह इस्राएलाच्या परमेश्वराने नेमून दिलेली सेवा विधीनुसार पार पाडण्याची जशी आज्ञा होती, त्याप्रमाणे ते परमेश्वराच्या मंदिरात प्रवेश करीत.

  16. लेवी वंशातील बाकीची संतती पुढीलप्रमाणे होती: अम्रामाचे पुत्र: शूबाएल; शूबाएलाचे पुत्र: यहदायाह.

  17. रहब्याहचे पुत्र: इश्शीयाह प्रथमपुत्र.

  18. इसहारचे पुत्र: शलोमोथ; शलोमोथाचे पुत्र: यहथ.

  19. हेब्रोनाचे पुत्र: यरीयाह प्रथमपुत्र, अमर्‍याह दुसरा, यहजिएल तिसरा व यकमाम चौथा.

  20. उज्जीएलाचे पुत्र: मीखा; मीखाहच्या पुत्रांपैकी: शामीर.

  21. मीखाहचा भाऊ: इश्शीयाह; इश्शीयाचे पुत्र: जखर्‍याह.

  22. मरारीचे पुत्र: महली व मूशी. याजीयाहचा पुत्र: बनो.

  23. मरारीचे पुत्र: याजीयाहकडून: बनो, शोहम, जक्कूर व इब्री.

  24. महलीकडून: एलअज़ार, त्याला पुत्र नव्हता.

  25. कीशाकडून: कीशाचा पुत्र: यरहमेल.