मुख्य मजकुरावर जा

The Feast of Tabernacles बद्दल बायबलमधील वचने

39 वचने · 17 पैलू

प्रमुख बायबल वचने

पुस्तकानुसार गाळा
  1. नियमित होमार्पण व त्याबरोबरचे धान्यार्पण आणि पेयार्पण याशिवाय पापार्पणासाठी एक बोकड अर्पावा.

  2. “ ‘तुमचे नवस व तुमची स्वखुशीची अर्पणे याबरोबरच तुमची होमार्पणे, धान्यार्पणे, पेयार्पणे व शांत्यर्पणे तुमच्या नेमलेल्या सणाच्या वेळी याहवेहस अर्पण करावे.’ ”

  3. मग मोशेने त्यांना आज्ञा दिली: “प्रत्येक सातव्या वर्षाच्या शेवटी, कर्ज माफीच्या वर्षी, मंडपांच्या उत्सवात,

  4. याहवेह तुमच्या परमेश्वराने निवडलेल्या ठिकाणी जेव्हा सर्व इस्राएली लोक उपस्थित होतील, तेव्हा हे नियमशास्त्र त्यांना ऐकू जाईल असे वाचावे.

  5. लोकांना एकत्र करा—पुरुष, स्त्रिया आणि मुले आणि तुमच्या नगरात राहत असलेले परदेशी—म्हणजे ते ऐकतील आणि याहवेह तुमच्या परमेश्वराचे भय बाळगण्यास शिकतील व या नियमशास्त्रामधील सर्व वचने काळजीपूर्वक पाळतील.

  6. याहवेहने आज हे केले आहे; आजच आपण आनंद व उल्लास करू.

  7. याहवेह, आमचे तारण करा! याहवेह, आम्हाला यशस्वी करा!

  8. याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो. आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.

  9. याहवेहच परमेश्वर आहेत; त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणुकीत सामील व्हा.

  10. तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन; तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन.

  11. याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.

  12. मग सणाच्या शेवटच्या म्हणजे सर्वात महत्त्वाच्या दिवशी, येशू मोठ्याने म्हणाले, “जे कोणी तहानलेले असतील, त्यांनी माझ्याकडे यावे आणि प्यावे.

  13. शास्त्रलेखात सांगितल्याप्रमाणे, जे कोणी माझ्यावर विश्वास ठेवतात, त्यांच्यामधून जिवंत पाण्याच्या नद्या वाहतील.”

  14. त्यांच्या म्हणण्याचा अर्थ, ज्यांनी विश्वास ठेवला त्या प्रत्येकाला पवित्र आत्मा दिला जाणार होता. परंतु त्यावेळेपर्यंत तो आत्मा दिला गेला नव्हता, कारण येशूंचे गौरव अद्याप झाले नव्हते.