The Feast of Tabernacles बद्दल बायबलमधील वचने: Singing hosannas
Singing hosannas बद्दल वचने
याहवेहने आज हे केले आहे; आजच आपण आनंद व उल्लास करू.
याहवेह, आमचे तारण करा! याहवेह, आम्हाला यशस्वी करा!
याहवेहच्या नावाने येणारे धन्यवादित असो. आम्ही याहवेहच्या मंदिरातून तुम्हाला आशीर्वाद देतो.
याहवेहच परमेश्वर आहेत; त्यांनी त्यांचा प्रकाश आमच्यावर टाकला आहे. डहाळ्या हातात घेऊन वेदीच्या शिंगापर्यंत जाण्यासाठी मिरवणुकीत सामील व्हा.
तुम्हीच माझे परमेश्वर आहात आणि मी तुमचे स्तवन करेन; तुम्हीच माझे परमेश्वर आहात, मी तुमचे स्तुतिगान करेन.
याहवेहचे उपकारस्मरण करा, कारण ते फार चांगले आहेत; त्यांची प्रीती अनंतकाळची आहे.